तुझी खरी आई कोण आहे? हा प्रश्न विचारल्यावर सुस्मिता सेनची मुलगी भावूक होत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने दोन मुलींना रेनी आणि अलिशाला दत्तक घेतलं आहे. 

Updated: Jul 8, 2021, 10:11 PM IST
तुझी खरी आई कोण आहे? हा प्रश्न विचारल्यावर सुस्मिता सेनची मुलगी भावूक होत म्हणाली... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने दोन मुलींना रेनी आणि अलिशाला दत्तक घेतलं आहे. या दोघींसोबत तिचं खूप छान बॉन्डिंग आहे. ती अनेकदा आपला वेळ या दोघींसोबत घालवताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेनी सेनला विचारलं गेलं की, तिला आपल्या खऱ्या आईबद्दल जाणून घ्यायचं आहे का? यावर तिने दिलखुलास उत्तर दिलं आहे.

दिलेल्या एका मुलाखतीत दत्तक घेण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना रेनी सेन म्हणाली, 'मला माझ्या इन्स्टाग्रामवर हाच प्रश्न अनेकवेळा विचारला जातो. तुमची खरी आई कोण आहे? कृपया  मला एवढंच सांगा की, 'रिअल आई' म्हणजे काय असतं याची परिभाषा सांगा...रिअल मदर म्हणजे नेमकं काय?

रेनी सेन पुढे म्हणाली, 'हे मी समजते की लोकांना आमच्या पर्सनल आयुष्यात खूप रस असतो, आम्ही काय खातो वैगेरे. ते ठीक आहे. मात्र मला असं वाटतं की, लोकांनी एकमेकांशी थोडं प्रेमाने वागलं पाहिजे. माझं सत्य सगळ्यांसमोर आहे. पण काय होईल जर कोणी दुसरं असेल तर? मला नाही माहिती त्याचा त्यांच्यावर कसा ईफेक्ट होईल. मला वाटतं की, आपण थोडेसं सेंन्सेटिव्ह असलं पाहिजे. माझ्यासाठी हे वेगळं आहे कारण, मी त्यासोबत लहानाची मोठी झाली आहे. मला याचा काही फरक पडत नाही. मात्र ज्या लोकांना त्यांचं आयुष्य खाजगी ठेवायचं आहे त्यांना, हे त्रसदायक ठरु शकतं. जोपर्यंत स्वत: कोण काही सांगत नाही, किंवा याबद्दल बोलत नाही तोपर्यंत विचारू नका.'

सुष्मिता सेनने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, जेव्हा रेनी 16 वर्षांची झाली तेव्हा तिने तिच्या बयोलॉजिकल पॅरेंन्ट्स शोधण्यास काहीच रस नाहीये. रिनी सेनने 'सुट्टाबाजी' या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. रिनी सेनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, लवकरच ती बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.