VIDEO : सलमान खान मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर? पोलिसांची सुरक्षा अन् चाहते...

Salman Khan at Mumbai Railway Station : सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 29, 2025, 11:24 AM IST
VIDEO : सलमान खान मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर? पोलिसांची सुरक्षा अन् चाहते...  title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan at Mumbai Railway Station : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दुसऱ्या कोणाचा नसून बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आहे. सलमानचा हा व्हिडीओ मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवरचा आहे. स्टेशनवर तो त्याच्या बॉडीगार्ड्ससोबत पोहोचला होता. त्याशिवाय त्याच्यासोबत पोलिस देखील दिसले. असं म्हटलं जातं की सलमान इथे त्यांचा चित्रपट 'सिकंदर' च्या कोणत्या सीनच्या शूटिंगसाठी पोहोचला होता. 

सलमान खानच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तो रेल्वे स्टेशनला चालत आल्याचे दिसते. त्याच्या मागे लोकांची गर्दी दिसत आहे. पण हे लोक त्याचे चाहते नसून त्याच्या सुरक्षेसाठी असलेले बॉडीगार्ड आहेत. त्यांनी पोलिसांसारखे किंवा बॉडीगार्डचे कपडे परिधान केलेले नसून साधारण कपडे परिधान केले आहेत. तर लांब पोलिस देखील दिसत आहेत. 

पोलिसांसोबत तिथे चाहत्यांची गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या समोरून सलमान पुढे जाताना दिसला. सगळ्यांचं लक्ष हे सलमान खानकडे होतं. तर सलमान देखील त्यांच्याकडे पाहतोय. असं म्हटलं जातं की हा व्हिडीओ सलमान खानचा आगामी चित्रपट सिकंदरमधील एका सीनच्या शूटिंगचा आहे. त्यामुळे त्याच्या चारही बाजुंना लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर एका चाहत्यानं या व्हिडीओला शेअर करत लिहिलं की एआर मुरुगदॉस आम्हाला 1000 कोटींचा चित्रपट देणार आहेत. चाहत्यांनी जसं सलमानला पाहिलं त्यांचा उत्साह हा गगणात मावेना असा झाला. सलमान देखील त्याच्या चाहत्यांना शूटिंगच्यामध्ये थांबून हात हलवत त्यांचे आभार मानत होता.  

सलमानच्या या आगामी चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर एआर मुरुगदॉस दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित केली आहे. या चित्रपटात अॅक्शन, थ्रिल असणार आहे. दरम्यान, चित्रपटात सलमानसोबत काजल अग्रवाल, रश्मिका मंदाना, सत्यराज, शरमन जोशी आणि प्रतीक बब्बर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर हा चित्रपट 28 मार्च 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जेव्हा पासून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासून प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x