काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानवर कोर्ट देणार निकाल

काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर सुनावणी होणार आहे.

shailesh musale Updated: Apr 4, 2018, 01:01 PM IST
काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानवर कोर्ट देणार निकाल title=

जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर सुनावणी होणार आहे. जोधपूर न्यायालय या प्रकरणात सुनावणी करणार आहे. सुनावणी दरम्यान सलमान खान, सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे जोधपूरमध्ये उपस्थित राहणार आहे. आजच हे कलाकार जोधपूरला पोहोचण्याची शक्यता आहे.

२० वर्षापूर्वीचं प्रकरण

जोधपूरमधील कांकाणी गावाजवळ २० वर्षापूर्वी २ काळवीटांची शिकार केल्यामुळे गुरुवारी सीजेएम ग्रामीण देवकुमार खत्री हे निकाल देणार आहेत. या प्रकरणात सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरु होणार आहे. हम साथ साथ है सिनेमाच्या शूटींग दरम्याने हे सर्व कलाकार जोधपूरमध्ये होते.

गुरुवारी येणार निकाल

१ आणि २ ऑक्टोबर १९९८ ला रात्री कांकाणी गावात २ काळवीटांच्या शिकार प्रकरणी अभिनेता सलामन खान, सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि जोधपूरच्या दुष्यंतसिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याआधी या प्रकरणातील सर्व साक्षीदार आणि पुरावे कोर्टात सादर केले गेले आहेत. आता ५ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.