आयुष शर्माच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी; अभिनेताच्या कारला मोठा अपघात

अभिनेता आयुष शर्मा हा सलमान खानचा मेहुणा आहे. सलमान खानची बहिण अर्पिताचा तो नवरा आहे. आयुषही बॉलिवूड अभिनेता आहे. आता पर्यंत आयुषने अनेक सिनेमात काम केलं आहे. आयुषचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. आयुष नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. 

Updated: Dec 18, 2023, 11:36 AM IST
आयुष शर्माच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी; अभिनेताच्या कारला मोठा अपघात title=

मुंबई : अभिनेता आयुष शर्मा हा सलमान खानचा मेहुणा आहे. सलमान खानची बहिण अर्पिताचा तो नवरा आहे. आयुषही बॉलिवूड अभिनेता आहे. आता पर्यंत आयुषने अनेक सिनेमात काम केलं आहे. आयुषचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. आयुष नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. 

आयुष आणि अर्पिताला  दोन मुलं आहेत. 2018 मध्ये आयुषने 'लवयात्री' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. अंतिम या सिनेमात तो शेवटचा दिसला होता. या अभिनेत्याने सलमान खानची बहीण अर्पिता खानसोबत लग्न केलं असून या बॉलीवूडमधील नसतानाही, आयुष शर्माने 2018 मध्ये सलमान खानच्या बॅनरखाली बनलेल्या 'लवयात्री' चित्रपटातून पदार्पण केलं. 

अभिनेता आयुष शर्माच्या गाडीचा नुकताच मुंबईमध्ये अपघात झाला आहे. मात्र नशिबाने अभिनेता यावेळी कारमध्ये नव्हता. यावेळी ही कार त्याचा ड्राईव्हर चालवत होता. ही सगळी घटना खार जिमच्याजवळ घडली. हा अपघात एका मद्यधुंद चालकाने आयुषच्या कारला धडक दिली त्यामुळे घडला असं सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आयुषचा ड्रायव्हर ठिक आहे.  त्यामुळे मोठी दुर्घटना होताना टळली असंच म्हणावं लागेल. 

सलमान खानचा हा पाठिंबा केवळ आयुषच्या पदार्पणासाठीच नव्हे तर त्याच्या अनेक प्रोजेक्टसाठीही उपयुक्त ठरला. ऑक्टोबरमध्ये आयुषला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 5 वर्षे पूर्ण झाली होती यावेळी त्याने एक पोस्ट शेअर करत लिहिलं की, 'लवयात्री 5 ऑक्टोबर 2018 रोजी रिलीज झाली आणि हा प्रवास सुरु झाला. कुणीतरी बरोबरच म्हटलंय की, तुमचा पहिला चित्रपट नेहमीच खास असतो, म्हणून मी आज इंडस्ट्रीत 5 वर्षे पूर्ण केली आहेत. सिनेमा हिट आणि फ्लॉप होतील पण पहिल्या चित्रपटात काम केल्यासारखं काही वाटत नाही. शुक्रवारी थिएटरची वाट पाहत पहिल्यांदाच कॅमेऱ्याला सामोरं जाण्याची अस्वस्थता. यापेक्षा चांगली सुरुवात करायला सांगता आली नसती. एक फ्लॅट फूट डान्सर होण्यापासून ते वैभवी मर्चंटकडून गरबा शिकण्यापर्यंत. हे सगळं खूप खास आहे, 3 नवीन लोकांवर विश्वास ठेवल्याबद्दल सलमान खानचे खूप खूप आभार. आमची स्वप्ने आणि मी, आम्ही खरोखरच मोठ्या पडद्यावर आमच्या पद्धतीने डान्स केला. माझ्या या प्रवासात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल खूप खूप थँक्यू''