या कारणामुळे सलमान कतरिनाला जॉन अब्राहमसोबत चित्रपटात काम करु देत नव्हता...

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आपल्या दबंग स्टाईलसाठी ओळखला जातो

Updated: May 11, 2021, 09:24 PM IST
या कारणामुळे सलमान कतरिनाला जॉन अब्राहमसोबत चित्रपटात काम करु देत नव्हता...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आपल्या दबंग स्टाईलसाठी ओळखला जातो. एक काळ असा होता की सलमान आणि कतरिनाच्या अफेअरबद्दल बर्‍याच चर्चा असायच्या. त्यावेळी असं म्हटलं जायचं की, हे दोघंही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लग्नही करु शकतात. मोठ्या पडद्यावर कतरिना आणि सलमानच्या जोडीलाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंत दिली आहे. 'टायगर जिंदा है', 'भारत', 'पार्टनर' आणि 'मैने प्यार क्यूं कीया' अशा बर्‍याच चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

सलमान नेहमीच एक पजेसिव्ह प्रियकर म्हणून ओळखला जातो. २००९मध्ये जेव्हा कतरिना कैफला न्यूयॉर्क या चित्रपटाची ऑफर दिली गेली आणि सलमानला कळालं की, या सिनेमांत जॉन अब्राहिम यात मुख्य भूमिकेत असणार आहे. तेव्हा सल्लूने कतरिनाला हा चित्रपट करायला मनाई केली. ते एक खास कारण होतं ज्यामुळे, सलमानने कतरिनाला जॉनसोबत काम करायला नकार दिला

या कारणास्तव सलमानला जॉनपासून कतरिनाला दूर ठेवायचं होतं
सलमान खानची एक खासियत अशी आहे की, ज्या लोकांवर त्याने प्रेम केलं त्यांच्यावर त्याने जिव ओतला आहे, परंतु जी लोकं सलमानच्या विरोधात जातात त्यांना तो कायम लक्षात ठेवतो. कतरिना कैफनं जॉन अब्राहम सोबत काम करावं अशी सलमानची बिलकुल ईच्छा नव्हती.

कारण याआधी 2003मध्ये जॉनने कतरिनाला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविला होता. तुम्हाला 'साया' हॉरर सिनेमा आठवत असेल. या चित्रपटासाठी सर्वात आधी कतरिनाचीनिवड झाली होती. पण जॉनने कतरिनाचा अभिनय पाहिला आणि तिला हिंदी नीट बोलता येत नाही.

साया कतरिनाचा पहिला चित्रपट होता. ज्यासाठी तिला दोन दिवस शूट करुनही परफेक्ट शॉट देता आले नव्हते.. या सिनेमांत कतरिना भूताची भूमिका साकारत होती. कतरिनाने दोन दिवस शूट केल्यानंतर जॉनने तिला या सिनेमातून काढून टाकलं होतं.

हिंदी भाषेमुळे हातातून निघून गेला पहिला चित्रपट
या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केलं होतं. यानंतर या सिनेमात कतरिनाच्या जागी तारा शर्माला हिरोईन म्हणून घेण्यात आले. या कारणास्तव, कतरिनाने जॉनसोबत काम करु नये अशी सलमानची इच्छा होती. मात्र, कॅतरिनाने जॉनबरोबर न्यूयॉर्क या सिनेमांत काम केलं आणि या चित्रपटाला बॉक्सऑफसवर चांगलीच पसंती मिळाली.

कतरिनाच्या अभिनयाचंही कौतुक केलं गेलं. असंही म्हटले जातं की या चित्रपटाद्वारे कतरिना आणि जॉन देखील एकमेकांच्या खूप जवळ आले होते. ज्यामुळे सलमान आणि जॉनचे रिलेशन अजूनही खराबच आहेत. यामुळे हे दोघही एकमेकांसोबत काम करत