Video : जेव्हा सलमानच्या मागे कुत्रा धावतो...

काय आहे हा अजब प्रकार 

Updated: Sep 20, 2019, 11:33 AM IST
Video : जेव्हा सलमानच्या मागे कुत्रा धावतो...

मुंबई : बुधवारी रात्री आयफा अवॉर्ड २०१९ सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण ग्रीन कार्पेटवरील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओत सलमान खान आणि त्यामागे एक कुत्रा दिसत आहे. या सोहळ्याला सलमान खान नेव्ही ब्लू सूटमध्ये दिसला. फोटोग्राफरला पोझ देऊन सलमान निघून जातो तोच एक कुत्रा देखील त्याच्या मागे मागे धावत गेला. हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (हे पण वाचा - सलमानसोबतच्या या 'मिस्ट्री गर्ल'ला ओळखलं का?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Every dog has his day this was his time to shine and he knew #SalmanKhan is a big animal lover 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या व्हिडिओवर नेटीझन्सनी अनेक कमेंट केली आहे. काहींनी विचारलं, हा कुत्रा देखील या सोहळ्याला उपस्थित होता का? तर एका युझर्सने म्हटलं की, कुत्र्याला देखील बॉलिवूडचा झगमगाट आवडला वाटतं. तर काहींनी म्हटलं, मागे चालेल तर गाडी खाली नाही येणार. या युझरने हिट अँड रन केसशी संबंध जोडला. मजेची गोष्ट सोडली तर ग्रीन कार्पेटवर कुत्रा ही गोष्ट योग्य नाही. या व्हिडिओनंतर पुरस्कार सोहळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित राहिला. 

या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडच्या कलाकारांचा जबरदस्त जलवा पाहायला मिळाला. यावेळी दीपिका पदुकोण, सलमान खान, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रेखा, आयुष्मान खुराना, विक्की कौशल, रणवीर सिंह, माधुरी दीक्षित सारखे कलाकार पाहायला मिळाले.