सलमानमुळे आणखी एका नव्या चेहऱ्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

अनेक कलाकारांचा गॉडफादर म्हणून देखील सलमानची ओळख आहे.   

Updated: Feb 15, 2020, 11:11 AM IST
सलमानमुळे आणखी एका नव्या चेहऱ्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने आतापर्यंत अनेक कलाकारांना अभिनय क्षेत्रात आपलं वर्चस्व स्थापन करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे दबंग शिवाय त्याला सिनेसृष्टीत गॉडफादर म्हणून देखील ओळखले जाते. त्याने अनेक नवख्या कलाकारांसाठी बॉलिवूडचं दालन उघडं करून दिलं आहे. आता पुन्हा तो एका ब्राझीलियन अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये दाखल करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

या ब्राझीलियन अभिनेत्रीचे नाव लॅरिसा बोन्सी असं आहे. सलमानने यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारचा अधिकृत खुलासा केलेला नाही. परंतु लॅरिसाने तिच्या इन्स्टाग्रामवर सलमानसोबत एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'मला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे फार आनंदी आहे.' लिहिलं आहे. 

तर मग आता सलमानची नवी अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस येईल हे पाहाणं फार उत्सुकतेचं ठरणार आहे. सध्या सलमान त्याच्या आगामी 'राधे' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत मुख्य भूमिका साकारताना अभिनेत्री दिशा पटानी दिसणार आहे. 

त्याचप्रमाणे तो 'इंशाअल्लाह' चित्रपटात देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लिला भंसाळी तब्बल २५ वर्षांनी एकत्र येणार आहे. तर सलमानसोबत या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.