'या' अभिनेत्रीकडून सलमान खानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त; अखेर...

आता अभिनेत्रीचा सलमान सोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामुळे चर्चा रंगली आहे.

Updated: Feb 1, 2022, 06:13 PM IST
'या' अभिनेत्रीकडून सलमान खानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त; अखेर... title=

मुंबई : 'हम आपके है कौन' हा चित्रपट आजही ताज्या चित्रपटांच्या यादीत येतो. या चित्रपटाचे इतक्या वर्षानंतरही अनेक चाहाते आहेत. चित्रपटातील गाणे, संवाद आणि व्यक्तिरेखा यांनी रसिकांची मने जिंकली होती. हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता जवळ-जवळ 27 वर्षे झाली आहेत, मात्र अजूनही हा चित्रपट लोकांच्या पसंतीच्या यादीत आहे. या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षितच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली होती, मात्र माधुरीशिवाय आणखी एक अभिनेत्री या चित्रपटात होती. जिचं सलमान खानवर जीव जडला होता. ज्यामुळे तिला सलमान खानची बायको बनण्याची इच्छा होती.

'हम आपके है कौन' या चित्रपटात रीटाची भूमिका साकारलेली अभिनेत्री साहिला चढ्ढा तुम्हाला माहितीच असेल. रिटाने आपल्या क्यूट आणि फनी कॅरेक्टरने चाहत्यांची मने जिंकली. या चित्रपटात रीटा म्हणजेच साहिलाला प्रेम म्हणजेच सलमान खानची पत्नी बनायचे होते, पण तसे होऊ शकले नाही. यामध्ये दिग्दर्शकांनी माधूरी आणि सलमानची जोडी असल्याचे आधीच ठरवले होते. ज्यामुळे रीटाचे किती मन असले तरी तिला सलमानची पत्नी होण्याचे भाग्य लाभलंच नाही.

आता अभिनेत्रीचा सलमान सोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये साहिला म्हणजे रीटा फार बदललेली दिसत आहे, ज्यामध्ये चाहत्यांना तिला ओळखता देखील येत नाही.

तिचे सध्याचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटले की, ही तीच रिटा आहे का? दुसऱ्याने लिहिले विश्वास बसत नव्हता.

या फोटानंतर बरीच चर्चा रंगली, ज्यामध्ये हे समोर आलं की, या अभिनेत्रीला सलमानसोबत काम करायचं होतं. तेही त्याची बायको म्हणून. परंतु दिग्दर्शकांसमोर तिची काहीही चाललं नाही आणि अखेर तिला रीटाची भूमिका स्वीकारावी लागली.

साहिला च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, साहिलाने अभिनेता निर्मल बाबीसोबत लग्न केले. दोघांना एक मुलगी आहे. सध्या रिटा म्हणजेच साहिला फिल्मी ग्लॅमरसपासून दूर आहे आणि तिचे कौटुंबिक जीवन एन्जॉय करत आहे.