सलमान खान याची मुंबई विमानतळावर 'दबंगिरी', गिफ्ट देणाऱ्या चाहत्यासोबत असं काही केलं की...

Salman Khan Video: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. 

Updated: Jun 2, 2022, 08:46 AM IST
सलमान खान याची मुंबई विमानतळावर 'दबंगिरी', गिफ्ट देणाऱ्या चाहत्यासोबत असं काही केलं की...  title=

मुंबई : Salman Khan Video:बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. जगभारता या अभिनेत्याच्या चाहत्यांची कमतरता नाही. पण लोकांच्या हृदयावर राज करणारे हे स्टार्स कलाकार कधी-कधी आपल्या चाहत्यांशी असं काही गैरवर्तन करताना दिसतात की त्याची लाज वाटते. तसेच संतापही येतो. स्टार कलाकार अशा गैरवर्तनामुळे अनेकवेळा अडचणीत सापडतात. मात्र, त्यांच्यात सुधारणा होताना दिसत नाही. त्यात सलमानचा नंबर पहिला लागतो. सलमान खान पुन्हा संतापलेला आणि चिडलेला दिसून आला. ज्या चाहत्याने त्याच्यासाठी गिफ्ट आणलं त्याचा तो सन्मान ठेवू शकला नाही.

सलमान खान आपल्या बेफीकीर वृत्तीमुळे अनेकदा चर्चेत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो मुंबई विमानतळावर होता. सलमान गाडीतून खाली उतरताच. एक चाहता त्याच्याकडे फोटो फ्रेम घेऊन येतो. त्या व्यक्तीला पाहून सलमानच्या चेहऱ्यावर आट्या पडलेल्या दिसून येत आहे. कसा तरी सलमान खान त्याच्या चाहत्यासोबत फोटो काढतो.

सलमानचा व्हिडिओ व्हायरल

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

लोकांनी ट्रोल केले

सलमान खान याचे (Salman Khan) फॅन्ससोबतचे वागणे लोकांना आवडले नाही आणि त्यांनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एकाने तर लिहिलंय की मला तो पूर्वी आवडायचे पण आता नाही. एकाने असेही लिहिले की तोंड का वाकडे का करत आहे. अनेकांनी सलमानच्या या वृत्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

सलमान याची सुरक्षा वाढवली

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात होता. या वृत्ताला दुजोरा मिळाल्यानंतर सलमान याच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलण्यात आली. सलमान खान याच्या खासगी सुरक्षा दलासह मुंबई पोलिसांचे सुमारे 6 कॉन्स्टेबल त्याच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत सलमानच्या घराबाहेरही पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईने काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

सलमानचा 'टायगर 3'

सलमान खानच्या (Salman Khan) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच अभिनेता पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत  (Katrina Kaif) 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, अभिनेत्याने नुकताच 'कभी ईद कभी दिवाळी'च्या सेटवरील त्याचा फोटो शेअर केला होता आणि चित्रपटातील त्याचा लूक उघड केला होता. याशिवाय ती 'नो एंट्री 2' आणि 'किक 2'मध्ये खूप व्यस्त आहे.