Samantha सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत कितव्या क्रमांकावर, एवढी संपत्ती आणि कारची मालकिण

Samantha तिचा पगार आणि तिचं कार कलेक्शन 

Updated: Mar 10, 2022, 12:45 PM IST
Samantha सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत कितव्या क्रमांकावर, एवढी संपत्ती आणि कारची मालकिण  title=

मुंबई : सामंथा रुथ प्रभू (Samantha ruth prabhu)ने २०१० मध्ये  'विन्नईथांडी वरुवाया' सिनेमातून कॅमिओ केला. या सिनेमातून सामंथाने आपल्या करिअरची सुरूवात केली. २०१९ मध्ये सामंथा तमिळ सिनेमा 'सुपर डिलक्स'मध्ये पाहण्यात आलं. ज्यानंतर तिचे अनेक तेलुगू सिनेमा पाहायला मिळाले. गेल्यावर्षी १७ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुच्या 'पुष्पा' सिनेमात आयटम गाण्यामुळे समंथाने खूप कौतुक मिळवलं. 'Oo Antava OoOo Antava' या गाण्यावर अनेक रिल्स बनवण्यात आले. 

रिपोर्टनुसार, सामंथा टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. नयनतारा यांच्या नंतर दक्षिण भारतीय सिनेमात दुसऱ्या क्रमांकावर सामंथा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

सामंथा प्रत्येक सिनेमाकरता अथवा वेब सीरिजकरता ३ करोड ते ८ करोड रुपयांपर्यंत मानधन आकारते. पुष्पा या सिनेमातील ३ मिनिटांच्या आयटम साँग करता तिने ५ करोड रुपयांची ऑफर केली होती. 

२०२२ च्या रिपोर्टनुसार, सामंथाने नेट वर्थ ८० ($11 Million) करोड रुपये आहेत. तिची एका वर्षाची इनकम ही ३ करोड रुपयांहून अधिक आहे. महिन्याला २५ लाखाहून अधिक रुपये कमवते. 

सामंथा रुथ प्रभूचं हैदराबादमध्ये जुबली हिल्समध्ये एक लक्झरी डिझाइन घर आहे. तसेच देशातील अनेक ठिकाणी तिची संपत्ती आहे. 

सामंथा रुथ प्रभूकडे कार कलेक्शन मोठ्या प्रमाणात आहे. सामंथाच्या लक्झरी कारमध्ये बीएमडब्ल्यू ३ सीरिज, बीएमडब्ल्यू एक्स ५ आणि जॅगवार एक्सएफआर यांचा समावेश देखील आहे. 

नागा चैतन्यकडून घटस्फोट घेतल्यानंतर सामंथा आता तिच्या मित्र परिवारासोबत वेळ घालवत आहे. सध्या ती आपल्या सुट्यांचा काळ घालवत आहे.