नाग चैतन्य Move On झाल्यानंतर समांथाच्या आयुष्यातही नवा पुरुष? डायरेक्टरबरोबर रिलेशनमध्ये?

Samantha Ruth Prabhu Affair : एकीकडे नागा चैतन्यचा साखरपुडा, दुसरीकडे समांथाचं या दिग्दर्शकासोबत अफेअरच्या चर्चा!

दिक्षा पाटील | Updated: Aug 14, 2024, 10:23 AM IST
नाग चैतन्य Move On झाल्यानंतर समांथाच्या आयुष्यातही नवा पुरुष? डायरेक्टरबरोबर रिलेशनमध्ये? title=
(Photo Credit : Social Media)

Samantha Ruth Prabhu Affair : चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि दिग्दर्शकांमधील नात्याची चर्चा आणि अफवा या नेहमीच चर्चेत असते. आता सध्या चर्चा आहे ती समांथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक राज यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे आणि आता सगळेच सत्य जाणून घेण्यासाठी आतुर आहेत. सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की त्यांची फक्त प्रोफेशन्ल पार्टनरशिप होती की काही दुसरंच? 

याविषयी आणखी अफवां आहेत. असं म्हटलं जातं की तेलुगू दिग्दर्शक त्रिविक्रम, समांथासोबत एकाच हॉटेलमध्ये थांबले होते आणि जेव्हा त्याच्या पत्नीनं त्या दोघांना एकत्र पाहिलं तेव्हा हॉटेलमधून बाहेर काढलं होतं. त्यामुळे लोकांना त्यांच्या नात्यावर चर्चा करण्याची संधी मिळाली. पण जर समांथा आयुष्यात पुढे जाऊ शकते तर नागा चैतन्य देखील जाऊ शकतो. त्यामुळे तो टॉक्सिक आहे असं म्हणता येणार नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दुसरीकडे अफवा सुरु आहेत की समांथा ही 'द फॅमिली मॅन' चा दिग्दर्शक राजसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, यात कोणतंही सत्य आहे की नाही याविषयी काही माहित नाही. पण सोशल मीडियावर अशी चर्चा सुरु आहे की त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरु आहे. ही बातमी तेव्हा आली जेव्हा नागा चैतन्यनं शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला.  

खरंतर, 8 ऑगस्ट रोजी नागा चैतन्य आणि शोभिता हे साखरपुडा करणार आहेत, असं म्हटलं जात होतं. तर त्याच दिवशी त्या दोघांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर समांथासाठी असलेलं तिच्या चाहत्यांच प्रेम आणि आपुलकी वाढली. नेटकऱ्यांनी नागा चैतन्यला ट्रोल देखील केलं. आता जेव्हा समांथाच्या या अफेअरची चर्चा रंगू लागली तर चाहत्यांना आनंद झाला आहे. मात्र, तरीही या सगळ्यात किती तथ्य आहे हे अजून कोणालाही कळलेलं नाही. याशिवाय त्या दोघांनी किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणी या चर्चांवर काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा : कांजिवरम साडी... बॉयफ्रेंडची साथ... तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली जान्हवी कपूर

समांथा आणि नागा यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांनी 2017 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये दोघं विभक्त झाले. ते विभक्त होण्यावर सगळ्यांना आश्चर्य झाले. ते दोघं विभक्त झाल्यानंतर 2022 मध्ये समांथाला मायोसायटिस नावाचा आजार झाला. त्यानंतर तिनं स्वत: ला वेळ देण्यासाठी कामातून ब्रेक घेतला. आता ती सिटाडेल या सीरिजमध्ये दिसणार आहे.