UK Government Apologises To Sikh Community : यूके सरकारने काही दिवसांपूर्वी धूम्रपान विरोधी जाहिरातीवर शीख समुदायातील व्यक्तीचा फोटो वापरला. यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या परिणामी यूके सरकारला शीख समुदायाची माफी मागण्यास भाग पडले. यूकेमध्ये शीख समुदायातील लोकही मोठ्या प्रमाणात राहतात. नववर्षाच्या निमित्ताने यूकेतील आरोग्य आणि सामाजिक सेवा विभागाद्वारे काही जाहिराती करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक जाहिरात धूम्रपान विरोधी होती. संबंधित जाहिरात जरी लोकांमध्ये धूम्रपान करू नये याची जनजागृती करणारी होती तरी त्यावर मॉडल म्हणून शीख समुदायातील व्यक्तीचा फोटो लावल्यामुळे शीख समुदायाने त्यावर आक्षेप घेतला.
शिखांची आचारसंहिता ज्याला 'राहत मर्यादा' असे म्हटले जाते. त्यानुसार शीख समुदायातील लोकांना तंबाखू, अफू, सिगरेट, गांजा इत्यादींचे सेवन करण्यास सक्त मनाई असते. शिखांचे पहिले गुरु गुरू नानक यांचा असा विश्वास होता की, असे पदार्थ जे तुमचं मन दूषित करेल किंवा तुमचं ध्यान देवापासून विचलित करेल अशा सवयींपासून दूर राहा. त्यापैकीच एक म्हणजे धूम्रपान न करणे. धार्मिक संहितेनुसार शिखांना अशा पदार्थांच्या जवळ जाण्याची देखील परवानगी नाही.
शीख फेडरेशन यूकेने सरकारशी पत्रव्यवहार केला आणि धुम्रपानाशी निगडित जाहिरातीला शीख समुदायाशी जोडणे हे अयोग्य आणि आक्षेपार्ह असल्याचे म्हटले. इलफोर्ड नॉर्थच्या खासदाराने यावर स्पष्टीकरण देत म्हटले की, 'संबंधित चूक कशी झाली हे पाहून त्याची माहिती घेऊ तसेच अशा चुका पुन्हा होणार नाहीत यासाठी पुढे खात्रीशीर पाऊलं टाकू'.
हेही वाचा : 'फ्रेशर असून मला सर बोलला नाही,' तरुणाची पोस्ट व्हायरल; शिष्टाचारावरुन पेटला वाद
शीख एज्युकेशन कौन्सिलचे हरविंदर सिंग यांनी सांगितले की, 'त्यांना आशा आहे की NHS तसेच सरकारचे इतर घटक अशा त्रुटींपासून धडा घेतील. पोस्टरवर पगडी घातलेल्या शिखांचे चित्र वापरल्याने धूम्रपान आणि तंबाखू अशा व्यसनांशी शीख समुदायाचा थेट संबंध निर्माण होतो. यूकेच्या आरोग्य आणि सामाजिक काळजी विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की 'ही प्रतिमा आमच्या धूम्रपान विरोधी मोहिमेतील जाहिरातीत चुकीने समाविष्ट करण्यात आली होती आणि यामुळे कोणत्याही समाजाचा अवमान झाला असेल तर त्यासाठी आम्ही त्याची माफी मागतो. तसेच या संबंधित जाहिरात हटवण्यात आली आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.