मुंबईः समंथा रुथ प्रभूचा गुरुवारी 35वा वाढदिवस होता. या खास दिवशी समंथासोबत असं काही घडलं की ज्यामुळे समंथाचे डोळे भरून आले.
सामंथा आणि अभिनेता विजय देवरकोंडा काश्मीरमध्ये त्यांच्या आगामी तेलुगू सिनेमाचं चित्रीकरण करत आहेत. वाढदिवसाला सुद्धा शूटिंग असल्याने विजयने समंथाला एक गोड सरप्राईज दिलं. विजयने त्याच्या YouTubeचॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आणि इतर सदस्यांनी समंथाच्या वाढदिवसाला केलेली धमाल शेअर केली आहे.
विजयसह सिनेमाच्या टीमने समंथासाठी खोटी कथा, खोटा सीन रचला. ज्यामध्ये सामंथाला विजयसोबत भावनिक संवाद साधायचा होता. जेव्हा विजयची प्रतिक्रिया देण्याची वेळ आली तेव्हा त्याने तिला तिच्या खऱ्या नावाने म्हणजेच समंथा नावाने हाक मारली, त्यानंतर समंथाला हसू फुटलं.
Happy Birthday @Samanthaprabhu2
Wishing you full happinessLet’s make a love story now :)
Love and hugs,
Vijay. https://t.co/5mEfpp4Wws— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) April 28, 2022
इतकंच नाही तर जेव्हा त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हाच तिला खरं सरप्राईजच समजलं. त्यानंतर सेटवरील इतरांकडूनही समंथाला मोठा जल्लोष करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. व्हिडिओमध्ये समंथा विजय आणि इतर क्रू मेंबर्ससोबत सेटवर केक कापतानाही दिसत आहेत. हे सरप्राईज पाहून समंथाचेही डोळे पाणावल्याचं व्हिडीओतून दिसत आहे
त्याच्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना विजयने लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा @Samanthaprabhu2. समंथा आणि विजय यांनी यापूर्वी 2018मध्ये आलेल्या 'महानती' चित्रपटात एकत्र काम केलं होतं त्यानंतर आता एका तेलुगू कौटुंबिक सिनेमातून ते पुन्हा सोबत काम करत आहेत..