अरे बापरे ! घटस्फोटानंतर Samantha ने सांगितली बाळाच्या जन्माची तारिख

दोघांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चार वर्षांचं नातं संपवल्याची घोषणा करून सर्वांना धक्का दिला.

Updated: Feb 10, 2022, 06:11 PM IST
 अरे बापरे ! घटस्फोटानंतर Samantha ने सांगितली बाळाच्या जन्माची तारिख title=

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यासाठी गेले वर्ष चढउतारांनी भरलेले होते. एकीकडे, तिने द फॅमिली मॅन 2 आणि पुष्पा: द राइज या प्रोजेक्टद्वारे यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श केला.

दुसरीकडे, नागा चैतन्यसोबत नातं तुटल्याने तिचं वैयक्तिक जीवन अशांततेने भरलेले झालं होतं. दोघांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चार वर्षांचं नातं संपवल्याची घोषणा करून सर्वांना धक्का दिला.

या वाईट टप्प्यातून जाण्यासाठी समंथा सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसली, पण ती सोशल मीडियाच्या ट्रोलिंगपासूनही सुटू शकली नाही. समंथाला ही याचा सामना करावा लागला.

समंथा सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि ती वेळोवेळी तिच्या चाहत्यांसह थेट प्रश्नोत्तर सत्रे करत असते. अशाच एका सत्रादरम्यान एका ट्रोलरने समंथाला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारला. ट्रोलरने विचारले की तू आई कधी होणार आहेस?

समंथाला हा प्रश्न आवडला नाही आणि ट्रोलरला सडेतोड उत्तर देताना तिने तिची खोटी डिलिव्हरीची तारीख सांगितली, ज्यांना माझ्या बॉडीच्या फंक्शनमध्ये खूप रस आहे, मी त्यांना सांगते की "माझी डिलिव्हरी डेट 7 ऑगस्टला 7 वाजता आहे. 2022 मध्येच आहे."