समंथा प्रभू - विजय देवरकोंडा काश्मीरमध्ये शूटिंगदरम्यान स्टंट सीन करताना जखमी

Samantha, Vijay injured on film sets while shooting in Kashmir  : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (samntha ruth prabhu) तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमी चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोइंग आहे. एका चित्रपटाचे शूटिंग करत असताना दोघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

Updated: May 24, 2022, 09:20 AM IST
समंथा प्रभू - विजय देवरकोंडा काश्मीरमध्ये शूटिंगदरम्यान स्टंट सीन करताना जखमी title=

मुंबई : Samantha, Vijay injured on film sets while shooting in Kashmir  : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (samntha ruth prabhu) तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमी चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोइंग आहे. सध्या समंथा आणि विजय देवरकोंडा सिनेमाच्या शूटिंगमध्ये काश्मीरमध्ये व्यस्त आहेत. त्यांचा आगामी सिनेमा  ‘कुशी इन काश्मीर’ या सिनेमाचे शूटिंग करत असताना दोघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. सिनेमासाठी स्टंट सीन करताना जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

काश्मीरमध्ये त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असलेले दक्षिणेकडील स्टार्स समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांना एका सीक्वेन्सच्या चित्रीकरणादरम्यान दुखापत झाल्याची माहिती आहे.  या दोघांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

kushi या अ‍ॅक्शनने भरलेल्या सिनेमाच्या शूटिंग करत असताना दोघांना गंभीर दुखापत झाली, त्यामुळे काही तास शूटिंग थांबवावे लागले. समंथा आणि विजय काश्मीरमधील पहलगाम भागात स्टंटचा सीन करत असताना त्यांना दुखापत झाली. हे दृश्य खूपच कठीण होते. दोन्ही कलाकारांना लिडर नदीच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या दोरीवरुन वाहन चालवावे लागले, परंतु दुर्दैवाने, वाहन खोल पाण्यात पडले आणि दोघांच्या पाठीला दुखापत झाली, अशी माहिती विजय देवराकोंडा यांच्या टीमच्या प्रवक्त्याने दिली.

दरम्यान, मोठी दुखापत होऊनही समंथा आणि देवरकोंडा यांनी चित्रपटाचे शूटिंग सुरुच ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शूटिंगदरम्यान दोघांनीही पाठदुखीची तक्रार केली होती. त्यानंतर दोन्ही अभिनेत्यांना ताबडतोब दल तलावाच्या काठावरील हॉटेलमध्ये नेण्यात आले आणि फिजिओथेरपिस्टला बोलावण्यात आले. दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर ते पुन्हा आपल्या शूटिंगच्या कामात व्यस्त झाले आहेत.  दोन्ही कलाकार कडक सुरक्षेत शूटिंग करत आहेत आणि त्यांच्या जवळ जाण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. 

काही दिवसांपूर्वी, दोघांनी 'कुशी' टायटल ट्रॅकचा एक म्युझिक व्हिडिओ टीझर पोस्ट केला होता. यामध्ये दोघांमधील काही रोमँटिक क्षण शेअर करताना दिसले.