सलमाननं वर्षानुवर्षे व्यक्त न केलेलं प्रेम; पण आता 'ती' समोर आली आणि...

'भाईजान लग्न कधी करणार?'

Updated: Sep 21, 2021, 02:45 PM IST
सलमाननं वर्षानुवर्षे व्यक्त न केलेलं प्रेम; पण आता 'ती' समोर आली आणि...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांमुळे आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. सलमानने अनेक चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सलमान करियरच्या उच्च शिखरावर आहे. पण त्याला चाहत्यांकडून कायम एक प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे, 'भाईजान लग्न कधी करणार?' अद्यापही चाहत्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. पण आता सलमानच्या त्या प्रेमाबद्दल सर्वांना माहिती झालं आहे.

गेले कित्येक बिग बॉसचे सिझन सलमान खानने होस्ट केले आहेत. यादरम्यान एका एपिसोडमध्ये अभिनेता अजय देवगन आणि काजोल आल्यानंतर सलमानने त्याच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला केला आहे. सलमानने सांगितलं की  त्याला एक मुलगी फार आवडायची पण त्याने कधी त्याने कधी त्या मुलीसमोर आपल्या प्रेमाचा खुलासा केला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by S A R D A R (@salmanscombat)

सलमानने त्याचं प्रेम कधी व्यक्त केलं नाही. कारण जेव्हा 15 -20 वर्षांनंतर तो त्या मुलीला भेटला तोपर्यंत ती मुलगी आजी झाली होती. यावर सलमान म्हणाला, 'जर तेव्हा मी माझं प्रेम व्यक्त केलं असतं तर मी आज आजोबा झालो असतो...' सलमानने हा खुलासा केल्यानंतर काजल आणि अजयला हासू आवरलं नाही. सध्या सलमानचा हा जुना व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.