भेदरलेली नजर आणि डोळ्यात अश्रू; 62 दिवसांनी तुरंगाबाहेर आलेल्या राज कुंद्राची अवस्था

राज कुंद्राने कारागृहातून बाहेर येताच घेतले देवाचे दर्शन 

Updated: Sep 21, 2021, 02:44 PM IST
भेदरलेली नजर आणि डोळ्यात अश्रू;  62 दिवसांनी तुरंगाबाहेर आलेल्या राज कुंद्राची अवस्था

मुंबई : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचं आयुष्य 19 जुलै 2021 रोजी पार बदलून गेले. शिल्पा शेट्टीच्या पतीला राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. राज यांना मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे पोर्नोग्राफी चित्रपट निर्मिती आणि प्रकाशित करण्यात कथित सहभागाबद्दल अटक करण्यात आली होती. या सिनेमांमध्ये लोकांना जबरदस्तीने काम करायला लावल्याचा आरोपही त्याच्यावर होता. मात्र, आता कुटुंबाने आणि राज कुंद्राने सुटकेचा निःश्वास सोडला. तब्बल 62 दिवसांनी राज कुंद्राला जामीन मंजूर झाला आहे. 

तुरुंगातून बाहेर पडताना राज कुंद्राचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. राजची अवस्था पाहून लोक हैराण झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

या फोटोंमध्ये राज कुंद्रा खूप कमजोर दिसत आहेत. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले आहेत, तर त्याने सैल कपडे घातले आहेत. हातात प्लास्टिकची पिशवी घेऊन तो माध्यमांना समोरा गेला. यावेळी त्याच्या कपाळावर टिळा देखील लावलेला होता, अर्थताच तुरुंगातून बाहेर येताच त्याने थेट देवाचे आशीर्वाद घेतले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तुरुंगातून बाहेर पडलेला राज शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत दिसत आहे. माध्यमांना टाळून तो आपल्या घराकडे रवाना झाला. त्याचवेळी त्याने माध्यमांच्या एकाही प्रश्नाला कोणतेही उत्तर दिले नाही.

राज कुंद्राला पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली होती, त्यानंतर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवण्याचा आणि वेब ऍप्लिकेशन प्रकाशित करण्याचा आरोप होता. या प्रकरणात शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्या नावांसह अनेक अभिनेत्रींनी राजवर आरोपही केले होते.