नागा चैतन्यच्या घटस्फोटोवर वडील नागार्जुन यांची पहिला प्रतिक्रीया, दिला मुलाला पाठिंबा

 २ ऑक्टोबर २०२१ ला या कपलने घटस्फोट घेतला. 

Updated: Jan 14, 2022, 08:59 PM IST
नागा चैतन्यच्या घटस्फोटोवर वडील नागार्जुन यांची पहिला प्रतिक्रीया, दिला मुलाला पाठिंबा

मुंबई : टॉलीवूडचं पॉवर कपल, नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू 2014 मध्ये ऑटोनगर सूर्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी एकमेकांना काही काळ डेट केल्यानंतर लग्न केलं. यानंतर नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी 2015 मध्ये कबूल केलं की त्यांच्या मुलाला त्याचा योग्य सोबती सापडला आहे. गोव्यात दोन दिवसांच्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये 6-7 ऑक्टोबर 2017 रोजी या कपलने लग्नगाठ बांधली.

अशात ४ वर्षांच्या लग्नानंतर या पॉवर कपलकडून चाहते खूशखबरीची अपेक्षा करत होते. मात्र यांनी आपल्या ४ थ्या वेडिंग एनिवर्सरीच्या आधीच त्यांच्या चाहत्यांना घटस्फोट देवून धक्का दिला. २ ऑक्टोबर २०२१ ला या कपलने घटस्फोट घेतला. यानंतर एंटरटेन्मेंट इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. 

नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाच्या बातमीने संपूर्ण टॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. पण या बातमीचा सर्वात जास्त परिणाम त्याच्या प्रियजनांवर झाला. आता काही महिन्यांनंतर, समंथाचे एक्स सासरे आणि नागा चैतन्यचे वडील आणि साऊथ स्टार नागार्जुन यांनी याबद्दल उघडपणे आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी नागार्जुन म्हणाले की, त्यांना त्यांच्या मुलाचा अभिमान आहे. नागार्जुनने एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं की, त्यांच्या मुलाने ही परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली त्याचा मला अभिमान आहे.

''या सगळ्यात तो किती शांत राहिला याचा मला अभिमान आहे. कोणत्याही वडिलांप्रमाणे मला त्याची खूप काळजी होती. पण माझ्यापेक्षा त्याला माझी जास्त काळजी होती. तो मला विचारायचा, 'बाबा ठीक आहात ना?' आणि मी म्हणायचो, 'अरे, काय मी तुला हे विचारु शकतो का?

या कपलच्या घटस्फोटाची घोषणा होऊन तीन महिने झाले आहेत. मात्र अद्याप त्यामागचं खरं कारण स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या घटस्फोटाच्या कारणाबाबत अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असताना. अलीकडेच, बंगाराजू या त्यांच्या पुढच्या चित्रपटाचं प्रमोशन करताना, नागा चैतन्यने प्रथमच एका मुलाखतीत घटस्फोटाबद्दल सांगितलं की, हा परस्पर निर्णय होता. तो पुढे म्हणाला की जर सामंथा आनंदी असेल तर तो देखील आनंदी आहे.