सानिया मुलाला घेवून उतरली मैदानात

सानियाच्या 'या' फोटोवर अभिनेता रितेश देशमुखची प्रतिक्रिया.  

Updated: Mar 13, 2020, 08:57 AM IST
सानिया मुलाला घेवून उतरली मैदानात

मुंबई : आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग आहे. देशाच्या विकासात महिलांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. देशाला अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारी टेनिसपटू सानिया मिर्झाचा (Sania Mirza) एक फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. खुद्द सानियाने तिचा हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. फोटोमध्ये तिच्या एका हातात रॅकेट तर दुसऱ्या हातात मुलगा इझान आहे. अत्यंत बोलका असणारा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'माझं संपूर्ण जीवन या एका फोटोमध्ये आहे. यापेक्षा दुसरा कोणताही मार्ग माझ्याकडे नाही.' लिहिले आहे. हा फोटो इंडोनेशियाविरूद्ध मैदानात उतरण्या पूर्वीचा आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोला अभिनेता रितेश देशमुखने देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

'सर्वोकृष्ट फोटो' अशी प्रतिक्रिया तिने सानियाच्या फोटोला दिली आहे. काही दिवसांपूर्वी रितेशने त्याच्या हेअर स्टायलमुळे सर्वंचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने निर्माता डीजे स्नेक (DJ Snake) प्रमाणे हेअर स्टायल केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले होते. 

रितेश नुकताच 'बागी ३' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला आहे. सध्या रितेश देशमुख, टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर स्टारर 'बागी ३' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे.