मुंबई : 'आय एम कलाम' आणि 'जलपरी' यांसारखे दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या दिग्दर्शक नील माधव पांडा यांच्या नजरेतून 'कडवी हवा' प्रेक्षकांसमोर येतेय. हा सिनेमा दुष्काळग्रस्त बुंदेलखंडातल्या एका खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारीत आहे.
वातावरण बदलासारख्या गंभीर विषयावर या सिनेमाचं कथानक आधारलेलं आहे.
या सिनेमात संजय मिश्रा मुख्य भूमिकेत दिसत आहेत... ते एका शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसतील... तर त्यांच्या सोबतीला रणवीर शौरीदेखील महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहे. रणवीर अशा एका व्यक्तीच्या भूमिकेत दिसतोय जो मूळचा ओडिसाचा आहे... परंतु, जलप्रलयानंतर तो विस्थापित होऊन बुंदेलखंडात आलाय.
एकीकडे ओडिसामध्ये पाणीच पाणी दिसतंय... तर दुसरीकडे बुंदेलखंडात पाण्याच्या थेंबासाठी वणवण भटकणारी माणसं... आणि भेगा पडलेल्या भकास जमिनी...
हा सिनेमा २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. या ट्रेलरमधून या सिनेमाचा गंभीर आशय लक्षात येतोय.