अखेर संजय दत्तने वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली

सुनील दत्त आणि नर्गिस यांचा गंगा नदीघाटावर श्राद्धविधी करून अभिनेता संजय दत्त याने वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण केली आहे.

Updated: Sep 13, 2017, 08:43 PM IST
अखेर संजय दत्तने वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली  title=

वाराणसी  : सुनील दत्त आणि नर्गिस यांचा गंगा नदीघाटावर श्राद्धविधी करून अभिनेता संजय दत्त याने वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण केली आहे.

राणी घाटावर हा श्राद्धविधी करण्यात आला. 

सिद्धिविनायक मंदिराचे पुजारी राजेंद्र कुमार शर्मा यांच्यासह ८ पुजाऱ्यांनी श्राद्धाची क्रिया पूर्ण केली. यावेळेस संजय दत्त सोबत त्याच्या आगामी 'भूमी' चित्रपटाची टीमदेखील होती.  या चित्रपटात संजयच्या मुलीची भूमिका साकारणार्‍या आदिती राव हैदरी हिनेदेखील श्राद्धविधीला उपस्थिती लावली होती. 

'कारागृहातून सुटल्यानंतर माझं पिंडदान जरूर करशील, असे बाबांनी मला सांगितले होते. त्यामुळेच त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आज हा विधी पार पाडला.' असे संजय दत्तने सांगितले. 

 श्राद्धविधीनंतर संजय दत्तला काशी विश्वनाथ मंदिर आणि काळभैरव मंदिरात दर्शनासाठी जाण्याची इच्छा होती.मात्र चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याने  कार्यक्रमात बदल करून संजय 'भूमी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनबीम शाळेत पोहोचला.

२५ मे २००५ साली वांद्र्याच्या राहत्या घरी सुनील दत्त  यांचे हार्ट अटॅकने निधन झाले होते. तर  कॅन्सरशी लढा देताना नर्गिस यांनी ३ मे १९८१ रोजी या जगाचा निरोप घेतला.