संजय दत्तच्या कमबॅक ‘भूमी’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

अभिनेता संजय दत्त याच्या आगामी ‘भूमी’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं होतं.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Aug 10, 2017, 07:01 PM IST
संजय दत्तच्या कमबॅक ‘भूमी’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज title=

मुंबई : अभिनेता संजय दत्त याच्या आगामी ‘भूमी’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं होतं.

ज्यावरून यात संजय दत्तचा लूक कसा असेल हे दिसलं होत. पिता आणि मुलीच्या नात्याची अनोखी कथा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. 

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रिलीज होणारा संजय दत्तचा हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाची त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यासोबतच या सिनेमात संजय दत्त एका पित्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अदिती राव हैदरी त्याच्या मुलीच्या भूमिकेत असणार आहे. दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या २२ सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.