मुंबई : संजीव कुमार यांचा जन्म सुरतमध्ये 9 जुलै 1938 रोजी जेठालाल जरीवालाच्या एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. संजीव कुमार यांच नाव हरिहर जरीवाला होतं. संजीव कुमार यांच निधन होऊन आज 33 वर्षे झाली. सुरूवातीला संजीव कपूर थिएटरशी जोडले होते. मात्र त्यानंतर त्यांनी फिल्मालयच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये अॅडमिशन घेतलं.
यानंतर 1950 साली त्यांनी फिल्मालयच्या बॅनरखाली हिंदुस्तानी या सिनेमात एक छोटीशी भूमिका साकारली. मात्र त्यांनतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आपल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे ते एक लोकप्रिय अभिनेता बनले.
संजीव कुमार यांनी यासाठी लग्न केलं नाही कारण त्यांना हार्टचा त्रास होता. त्यांच्या कुटुंबातील अनेक लोकांचे निधन हे वयाच्या 50 वर्षांच्या अगोदरच झाला होता. संजीव कुमार हेमा मालिनीवर प्रेम करत होते पण त्यांना अभिनेत्री सुलक्षणा पंडित आपला जीव ओवाळून टाकत असे. सुलक्षणाने त्यांना प्रपोज देखील केलं होतं. मात्र त्यांना ते प्रपोझल स्विकारलं नाही.
सुलक्षणाने संजीव कपूर यांना लग्नासाठी अनेकदा तयार करण्याचा प्रयत्न केला. संजीव कुमार यांच्या निधनानंतर सुलक्षणा डिप्रेशनमध्ये गेली. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण सुलक्षणा संजीव कुमार यांच्या प्रेमात एवढ्या आकंठ बुडाल्या होत्या की त्यांनी आजपर्यंत लग्न केलेलं नाही.