मराठमोळ्या अभिनेत्यानं घेतलं उज्जैन येथील महाकाल अन् काल भैरवनाथचं दर्शन, पोस्ट शेअर करत म्हणाला...

Santosh Juvekar Post: संतोष जुवेकर हा सगळ्यांचाच लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या त्याची एक पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. काहींना त्याला ट्रोल केले आहे त्यावर संतोषनंही सपाटून उत्तर दिले आहे. नक्की काय आहे प्रकरण? 

Updated: Jun 16, 2023, 10:55 PM IST
मराठमोळ्या अभिनेत्यानं घेतलं उज्जैन येथील महाकाल अन् काल भैरवनाथचं दर्शन, पोस्ट शेअर करत म्हणाला... title=
Santosh Juvekar | Instagram

Santosh Juvekar Post: मराठी कलाकार हे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. हल्ली अनेक कलाकार हे उघडपणे आपली मतं आणि अनुभव इंटरनेटवर शेअर करताना दिसतात. इन्टाग्रावरही त्यांचे लाखो फॉलोवर्स असतात त्यांना फॉलो करणारेही अनेक चाहते आहेत. सध्या अशाच एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ज्यामुळे अभिनेत्याला टीकेलाही सामोरे जावे लागते आहे. अभिनेता संतोष जुवेकरची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. यावेळी त्यानं उज्जैन येथील महाकाल आणि काल भैरवनाथचे दर्शन घेतले. सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरही यावेळी त्याच्यासोबत होता. सध्या त्यानं आपली एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यात त्यांनी केलेल्या दर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 

त्याच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स पाऊस पाडला आहे. परंतु काहींनी मात्र त्याला ट्रोल केले आहे. त्यानं हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये जे लिहिलं आहे त्यावरून नेटकऱ्यांनी त्याला रडारवर घेतले परंतु त्यावरही त्यानं उत्तर दिले आहे. संतोष जुवेकर हा आपल्या आगळ्यावेगळ्या आणि हटके चित्रपटांसाठी ओळखला जातो सोबतच त्याच्या अनेक भुमिका या गाजल्या आहेत. सध्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये त्यानं नक्की काय लिहिलंय? 

हेही वाचा - Adipurush नं केलं हताश; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

इन्टाग्रामवर त्याची एक पोस्ट व्हायरल होते आहेत ज्यात त्यानं आपल्या उज्जैन येथील फोटोज शेअर केले आहेत आणि खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ''आमच्या महेश दादामुळे सध्या अनेक देवस्थानांच्या दर्शनांच पुण्य मला मिळतय. काल पहिल्यांदा उज्जैन येथे महाकाल आणि काल भैरवनाथचे दर्शन घेतलं. अगदी अभिषेक सुद्धा करायला मिळाला आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवली त्याच्या गाभाऱ्यात तशीच ऊर्जा मला अनेक मंदिरात जाणवली आहे मी चर्च मधे सुद्दा जातो गोव्यात गेलो की काही जुनी चर्च आहेत मला आवडत जायला. मी दरग्यातही जातो नाशिकहून ठाण्याकडे येताना घाट संपला की डाव्या बाजूला एक दर्गा आहे मी नचूकता आणि नचूकवता त्या दरग्यात जातोच जातो त्या चर्च आणि दरग्यातही मला तीच ऊर्जा जाणवते आणि ती सकारात्मक ऊर्जा कायम आपल्या सोबत रहावी ही प्रार्थना मी करतो कायम. पण मला आज त्या मंदिरातल्या देवाला त्या चर्च मधल्या येशूला आणि त्या दरग्यातल्या अल्ल्हाला सांगायचंय तुझ्या गाभाऱ्यात ही जी सकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्ण विश्वात भरुदे. हा सुद्धा तुझाचतर गाभारा आहेना.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका युझरनं लिहिलंय की, ''मंदिरात जाऊन आले आणि पोस्ट टाकली की खाली description मध्ये दर्गा आणी चर्चच पण महत्व लिहावं लागत बाबा कारण मग चुकून जर बाकीच्या धर्माचे फॅन्स नाराज झाले तर वरून हे पण लिहायचं मी काय अंधश्रधळू नाहीये म्हणजे स्वतःला पुरोगामी पण सिद्ध करून झालं. मंदिरात गेलात ना फक्त्त तेवढंच लिहा ना नंतर चर्च मध्ये जाऊन त्याबद्दल लिहा. किती ही लाचारी आणी hyopocrisy.'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं की, ''चर्च आणि दर्ग्यात जाण्याची गरज नाही अस मला वाटतं तुम्ही ॲक्टर आहे म्हणून या गोष्टी करत असाल अस मला वाटत असो तुमचं मत आहे'' ट्रोलर्सवर संतोषनं आपल्या सर्वांचं भलं हवो, अशीच सदिच्छा मागितली आहे.