close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सारासोबत वेळ घालविण्यासाठी कार्तिकने लग्न टाळलं

 बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्याविषयी सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा...

Updated: Aug 22, 2019, 07:15 PM IST
सारासोबत वेळ घालविण्यासाठी कार्तिकने लग्न टाळलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्याविषयी सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू असते. अनेकदा दोघांना एकत्र फिरतांना पाहिलं गेलं आहे. सारा कार्तिकला सरप्राईज देण्यासाठी काही दिवसांपूर्वी दोनदा लखनऊला गेली होती. कार्तिकचा आगामी 'पती पत्नी और वो' चित्रपटाचे चित्रिकरण हे लखनऊ येथे सुरू आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार कार्तिक अनेकदा सारासोबत वेळ घालवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. कार्तिकने साराबरोबर डेटवर जाण्यासाठी बालीमध्ये होणाऱ्या लग्न सोहळ्यामध्ये जाण्याचं टाळलं. या लग्नात कार्तिकला अभिनेत्री कतरिना कैफसोबत उपस्थित राहायचे होते. मात्र ऐनवेळी कार्तिकने या लग्न सोहळ्यात उपस्थित राहण्यास नकार दिला.

Sara Ali Khan, Kartik Aaryan share a laugh as they get snapped at airport together — Pics

या लग्न सोहळ्यात बॉलिवूडमधील इतर कलाकार देखील उपस्थित होते. कार्तिकला सारासोबत वेळ घालवायचा असल्यानं त्याने लग्नात जाण्यास नकार दिला असेल, अशी सध्या चर्चा सुरू आहे. काही दिवसापूर्वी साराने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये तिला कार्तिक आवडत असल्याचं सांगितले होतं. 

तेव्हापासूनच कार्तिक आणि सारा यांच्या नात्याविषयी सोशल मीडियावर चर्चा होत होती. दिग्दर्शक इम्तियाज अलीचा आगामी चित्रपट 'लव आजकल २'मध्ये सारा आणि कार्तिक हे एकत्र झळकणार आहेत. 

लवकरच कार्तिक ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण जवळपास पूर्ण झाल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण झाल्यानंतर ‘भूल भुलैया’ या चित्रपटाच्या रिमेकसाठी कार्तिक काम करणार आहे. तर सारा ‘कुली नंबर 1’ च्या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवनसह रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.