close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पीओकेसाठी सीमेवर लढण्यास तयार 'हा' बॉलिवूड अभिनेता

सिमेवर लढण्यासाठी तयार 'हा' अभिनेता

Updated: Aug 22, 2019, 07:11 PM IST
पीओकेसाठी सीमेवर लढण्यास तयार 'हा' बॉलिवूड अभिनेता

मुंबई : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवण्यात आलं. त्यानंतर अनेकांकडून याबाबत विविध प्रतिक्रिया येत आहेत. पण याबाबत आता एका बॉलिवूड अभिनेत्याचं विधान समोर आलं आहे. हा अभिनेता बॉर्डरवर जाऊन लढण्यासाठीही तयार असल्याचं त्याने म्हटलंय.

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने या मुद्द्यावर एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून केआरकेने काश्मीरबाबतचं त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.

कमालने ट्विट करत, 'पाकव्याप्त काश्मीरचा भाग आपल्या ताब्यात घेण्यासाठी, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर, मी सिमेवर जाऊन लढण्यासाठी तयार असल्याचं' कमाल खानने म्हटलंय. कमाल खानच्या या ट्विटनंतर अनेकांकडून त्याचं कौतुक होताना दिसतंय. तर काही लोक या ट्विटनंतर त्याला ट्रोलही करत आहेत.

कमाल खानने आणखी एक ट्विट करत, देशातील भ्रष्ट्राचारावरही निशाणा साधला आहे. 

त्यानंतर रात्री उशिरा KRKने ट्विट करत सोशल मीडियामधून कायमचं बाहेर जाण्याबाबतही म्हटलंय. त्याने ट्विट्समुळे अतिशय तणाव येतो आणि हा ताण आता सहन करु शकत नसल्याचं त्याने म्हटलंय. 

कमाल खानने बॉलिवूडमध्ये 'देशद्रोही' चित्रपटातून करियरी सुरुवात केली. सलमानच्या बिग बॉस सीजन 3 मुळेही तो प्रसिद्धीझोतात आला होता.