'चका चक'वर सारा-रणवीरचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

सारा अली खान रणवीर सिंगसोबत 'चका चक' गाण्यावर थिरकली आहे.

Updated: Dec 5, 2021, 05:17 PM IST
'चका चक'वर सारा-रणवीरचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान रणवीर सिंगसोबत आगामी चित्रपटातील 'चका चक' गाण्यावर थिरकताना दिसली आहे. साराने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती रणवीरसोबत तिच्या नवीन गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, रणवीर पांढरा टी-शर्ट आणि डेनिम जॅकेट आणि बूट घातलेला दिसत आहे. तर सारा बनारसी भारतीय पोशाखात जबरदस्त दिसत आहे.

दोघं एका गार्डनमध्ये गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. साराने व्हिडिओला कॅप्शन दिलंय की,"सुपर डुपर अल्ट्रा कूल रणवीर सिंग पुन्हा सिद्ध करत आहे की, तो किंग का आहे. यासाठी तुझे खूप खूप आभार." अक्षय कुमार आणि धनुषही 'अतरंगी रे'मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट २४ डिसेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

याआधी सारा अली खानने इन्स्टाग्रामवर माधुरी दीक्षितसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये सारा अली खानने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. माधुरी दीक्षितने गुलाबी रंगाचा सूट परिधान केला आहे. माधुरीच्या साधेपणातच तिचे ग्लॅमर दिसून येतंय.

सारा अली खानच्या ताज्या डान्स व्हिडिओमध्ये दोन्ही अभिनेत्री चना के खेत गाताना स्टेप्स करत आहेत. त्यानंतर चका चक या गाण्याच्या स्टेप्स करताना दोघंही डान्स करत आहेत. माधुरी दीक्षितसोबत डान्स करताना सारा अली खान खूपच खुश दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सारा अली खान सध्या अतरंगी रे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सारा अली खान अक्षय कुमार आणि धनुषसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सारा अली खानचा चित्रपट अतरंगी रे 24 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित होणार आहे.