सारा अली खानसोबत डान्स करताना हेअर स्टायलिस्टचा सुटला ताबा; पुढे जे झालं...

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 

Updated: Oct 6, 2022, 06:41 PM IST
सारा अली खानसोबत डान्स करताना हेअर स्टायलिस्टचा सुटला ताबा; पुढे जे झालं... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. तिची एनर्जी आणि तिची स्टाइल लोकांचं मन मोहून टाकते आणि ती सोशल मीडियावर तिच्या स्टाइलची जादू पसरवतानाही दिसते.

तिचे शेअर केलेले व्हिडिओ लोकांना खूप आवडतात आणि काही व्हायरलही होतात. पुन्हा एकदा सारा अली खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची एनर्जी अप्रतिम दिसत आहे पण ती ज्या पद्धतीने डान्स करत आहे त्यामुळे आता लोकं तिला ट्रोल करत आहेत. सारा अली खान स्टायलिश अदांनी डान्स करताना दिसत आहे.

हेअरड्रेसरसह रोमँटिक गाण्यावर डान्स केला
सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकतंच सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खान तिच्या हेअरस्टाइलिस्टसोबत जबरदस्त रोमान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये सारा अली खान तिच्या हेअर स्टायलिस्टसोबत 'बाहों में चले आओ' गाण्यावर रोमँटिक स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, जिथे हेअरस्टाइलिस्ट साराचे केस ग्रूम करत आहे तिथे अभिनेत्री त्याच्यासोबत रोमान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खानने ऑरेंज कलरचा लेहेंगा घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

साराची एनर्जी
व्हिडिओच्या पुढच्या भागात, सारा अली खान 'टिंकू जिया' गाण्यावर तिच्या हेअरस्टायलिस्टसोबत नाचताना दिसत आहे. सारा अली खानच्या या व्हिडीओवर लोकं खूप कमेंट करत आहेत आणि बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. कमेंट करत एका यूजरने साराबद्दल म्हटलं की, ती तिची लाज विसरली आहे.