सारा अली खानला कार्तिक आर्यनसोबत नाही तर तिच्या मामाशी करायचंय लग्न

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच उंची गाठणारी सारा अली खान तिच्या मेहनती आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

Updated: Sep 25, 2022, 09:37 PM IST
सारा अली खानला कार्तिक आर्यनसोबत नाही तर तिच्या मामाशी करायचंय लग्न title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच उंची गाठणारी सारा अली खान तिच्या मेहनती आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सारा अलीने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत ज्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे ते सर्वच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सारा अली खान दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का की सारा अली खान एकदा असं काही बोलली होती, जे ऐकून सगळेच थक्क झाले होते.

सारा अली खान ही बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे. अलीकडेच सारा तिचे वडील सैफ अली खानसोबत कॉफी विथ करण या शोमध्ये आली होती. कॉफी विथ करण या शोमध्ये करण जोहरने असे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो की अभिनेता किंवा अभिनेत्री थोडेसे विचित्र उत्तर देतात, त्यानंतर ते अडकतात आणि बराच वेळ चर्चेत राहतात. दरवेळेप्रमाणेच या वेळीही असंच काहीसं घडलं,  यावेळी या शोमध्ये जेव्हा करण जोहरने सारा अली खानला विचारलं की तुला कोणाशी लग्न करायचं आहे

यावर ती म्हणाली की मला रणबीर कपूरशी लग्न करायचं आहे आणि कार्तिक आर्यनला डेट करायचं आहे. पण तुम्हाला माहित आहे का की सारा अली खानचा नात्याने रणबीर कपूर मामा लागतो.

रणबीर कपूर हा साराच्या सावत्र आईचा म्हणजेच करीना कपूरचा भाऊ आहे. त्यानुसार रणबीर कपूर सारा अली खानचा मामा लागतो, पण सारा अली खानने ही गोष्ट न घाबरता सर्वांसमोर बोलून दाखवली. लक्षात घेण्यासारखं आहे की समोर त्याचे वडील सैफ अली खान देखील बसले होते. ही गोष्ट तिने वडिलांसमोर सांगितली होती.

यानंतर करण जोहरने सैफ अली खानला या विषयावर तुझं काय मत आहे. असं विचारलं. तर सैफ अली खान म्हणाला,  माझ्या मुलीला जे आवडेल ते मलाही आवडेल. जेव्हा करणने साराला विचारले की तुला रणबीरला डेट करायला आवडेल का, तेव्हा तिने नकार दिला, ती म्हणाली, मला फक्त रणबीरशी लग्न करायचं आहे. मला फक्त कार्तिक आर्यनला डेट करायचे आहे.