व्हिडिओ : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावमध्ये रंगली साडी नेसण्याची स्पर्धा

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर स्त्री सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

Updated: Aug 22, 2018, 02:20 PM IST
व्हिडिओ : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावमध्ये रंगली साडी नेसण्याची स्पर्धा title=

मुंबई : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर स्त्री सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यापूर्वी दोघेही सिनेमाचे जबरदस्त प्रमोशन करत आहेत. या प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्यात झटपट साडी नेसण्याची स्पर्धा रंगली आहे.

या व्हिडिओत श्रद्धा कपूर साडी नेसण्यात राजकुमार रावला हरवत असली तरी राजकुमारची साडी नेसण्याची पद्धत काहीशी हटके आहे. व्हिडिओत श्रद्धा झटपट कशीही साडी गुंडाळते तर राजकुमार राव आरामात अगदी व्यवस्थित साडी नेसण्याचा प्रयत्न करत असतो.

पाहा व्हिडिओ...

 

@shraddhakapoor and @rajkumarrao_official are up to saari draping competetion... Good fun!! #shraddhakapoor #stree #rajkumargupta #saree #competetion #promotion #celebrity #celeb #perfection #sareedraping #filmfashionfood

A post shared by FiFaFoo (@filmfashionfood) on

सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाने सांगितले की, हा सिनेमा एक हॉरर कॉमेडी आहे. त्यामुळे तुमचा आवडता हॉरर शो किंवा सिनेमा कोणता असे वारंवार त्यांना विचारले जाते. तेव्हा झी हॉरर शो श्रद्धा कपूरला फार आवडायचे आणि इतक्या सुरेख शोची निर्मिती केल्याबद्दल श्रद्धाने झी चे आभारही मानले. 

स्त्री सिनेमाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. तर निर्मिती मेडॉक फिल्म्सने केली आहे. ३१ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमाशिवाय राजकुमार राव 'मेड इन चायना', 'मेंटल है क्या' आणि 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर स्त्री सिनेमानंतर श्रद्धा नारायण सिंग यांच्या 'बत्ती गुल मीटर चालू' या सिनेमात शाहिद कपूरसोबत झळकेल.