VIDEO : 'बूम जवानी...' मधील सोनालीच्या घायाळ करणाऱ्या अदा

 'सेटर्स' चित्रपटाच्या आयटम सॉन्गवर सोनाली थिरकताना दिसत आहे.

Updated: Apr 30, 2019, 01:42 PM IST
VIDEO : 'बूम जवानी...' मधील सोनालीच्या घायाळ करणाऱ्या अदा title=

मुंबई : 'बूम जवानी...' या सोनालीच्या नवीन गाण्याणं सोशल मीडियाला, त्याचप्रमाणे तरूणाईला वेड लावलं आहे. 'सेटर्स' चित्रपटाच्या आयटम सॉन्गवर सोनाली थिरकताना दिसत आहे. तिच्या या घायाळ अदा सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. नुकतंच प्रदर्शित करण्यात आलेलं गाणं आतापर्यंत तब्बल २,३१२,३९६ वेळा पाहण्यात आलं आहे. 'सेटर्स' चित्रपट ३ मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी चौधरी यांनी केलं आहे. 

'सेटर्स' चित्रपट एका क्राईम थ्रिलरवर आधारलेला आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत आफताब शिवदासानी आणि श्रेयस तडपदे झळकणार आहेत. अभिनेत्री इशिता दत्ता सुद्धा दिसणार आहे. 'सेटर्स' चित्रपटाचे चित्रीकरण बनारस, जयपूर, मुंबई आणि दिल्लीमध्ये करण्यात आलं आहे.