सावनी रवींद्र अडकली विवाहबंधनात

सध्या लग्नसराईचा हंगामा सुरु आहे. लग्नाची धमाल सुरु आहे. अनेक मराठी कलाकारांनी या वर्षात लग्नगाठ बांधली. 

Updated: May 7, 2018, 05:51 PM IST
सावनी रवींद्र अडकली विवाहबंधनात

मुंबई : सध्या लग्नसराईचा हंगामा सुरु आहे. लग्नाची धमाल सुरु आहे. अनेक मराठी कलाकारांनी या वर्षात लग्नगाठ बांधली. यात आता आणखी एका मराठी गायिकेची भर पडलीये. प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र हिने नुकतीच नव्या आयुष्याला सुरुवात केलीये. ती नुकतीच लग्नबंधनात अडकलीये. ही बातमी तिने फेसबुकवरुन आपल्या चाहत्यांना दिलीये. सावनी रवींद्र डॉ. आशिष धांडे यांच्याशी विवाहबद्ध झालीये. आयुष्याच्या नव्या थरारक प्रवासाला सुरुवात. ही आहे नवी सुरुवात. लव्ह यू डॉ. असे तिने फेसबुकवर पोस्ट करत आपल्या लग्नाची बातमी दिली. सावनीने ही पोस्ट टाकताच अनेकांनी तिला कमेंट बॉक्समधून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. 

या लग्नसोहळ्यात सावनीने पारंपारिक पोशाख अर्थात नऊवारी परिधान केली होती. यात तिचा लूक अंत्यत सोज्वळ असा दिसत होता. तर रिसेप्शनसाठीही तिचा लूक अतिशय सुंदर होता. तिच्या जवळच्या मैत्रिणीने सावनीच्या लग्नातले फोटो शेअर केलेत. 

पुण्यातील शुभारंभ लाँन्स येथे हा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यास मोजके पाहुणे, मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. सावनीचे पती पेशाने डॉक्टर आहेत. आशिष आणि सावनी यांचा मार्चमध्ये साखरपुडा झाला होता. होणार सून मी या मालिकेच्या टायटल साँगमुळे तिचा आवाज घराघरात पोहोचला होता.