'रागिणी एमएमएस रिटर्न्स'चे नवे पोस्टर रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा शर्मा लवकरच आपल्या आगामी 'रागिणी एमएमएस रिटर्न्स' मधून कमबॅक करत आहे. या चित्रपटाचे पोस्टरही नुकतेच लॉंच करण्यात आले आहे. भारतीय डिजिटल प्लॅटफॉर्मवरचे आतापर्यंतचे हे सर्वात बोल्ड पोस्टर असल्याचे बोलले जात आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 11, 2017, 07:36 PM IST
'रागिणी एमएमएस रिटर्न्स'चे नवे पोस्टर रिलीज

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा शर्मा लवकरच आपल्या आगामी 'रागिणी एमएमएस रिटर्न्स' मधून कमबॅक करत आहे. या चित्रपटाचे पोस्टरही नुकतेच लॉंच करण्यात आले आहे. भारतीय डिजिटल प्लॅटफॉर्मवरचे आतापर्यंतचे हे सर्वात बोल्ड पोस्टर असल्याचे बोलले जात आहे.

करिश्मा शर्मा या पोस्टरमध्ये टॉपलेस अंदाजात झळकली आहे. तर, सिद्धार्थ गुप्ताही त्याच अंदाजात दिसतो. पण, या पोस्टर्समध्ये आणखी एक व्यक्तीही दिसते. ही व्यक्ती नेमकी कोण आहे, हे मात्र, अद्याप स्पष्ट झाले नाही.

Ragini MMS Return's, Web Series
बोल्ड आणि बिनधास्तपणामुळे अनेकांच्या नजरा या पोस्टरकडे आपसूकच वळतात. पण, करिश्मा आणि सिद्धार्थ यांची पोस्टरमधली खास पोज नजर खिळवून ठेवण्यास कारणीभूत ठरते. पोस्टरवर लाल रंगाच्या साडीत एक चेहरा पहायला मिळतो. ज्याचे डोळे हलकेच नजरेला पडतात .

 

दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात करिश्मा शर्मासोबतच रिया सेनसुद्धा सिमरनच्या भूमिकेत दिसणार आहे.