close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अनुपम खेर @64; वयाच्या २८ व्या वर्षीच ओलांडलेली साठी

35 वर्षांच्या आपल्या करियरमध्ये अनुपम यांनी 500 हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. 

Updated: Mar 7, 2019, 09:41 AM IST
अनुपम खेर @64; वयाच्या २८ व्या वर्षीच ओलांडलेली साठी

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आज आपला 64वा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या 28व्या वर्षी अनुपम खेर यांनी बॉलिवूडमधून आपल्या करियरची सुरूवात केली. विशेष म्हणजे इतक्या लहान वयात अनुपम खेर यांनी 65 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमटवला. 35 वर्षांच्या आपल्या जबरदस्त करियरमध्ये अनुपम यांनी 500 हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. 

7 मार्च 1955 साली शिमला शहरातील एका काश्मीरी पंडित कुटुंबात अनुपम खेर यांचा जन्म झाला. त्याचं सुरूवातीचं आयुष्य अतिशय संघर्षपूर्ण होतं. शिमलातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अॅक्टर बनण्याच्या इच्छेने ते मुंबईत आले. 1984 साली अनुपम खेर यांनी 'सारांश' चित्रपटातून 65 वर्षाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. अनुपम खेर यांनी साकारलेल्या या भूमिकेचं संपूर्ण बॉलिवूडने कौतुक केलं होतं. 

happy 63rd birthday anupam kher

'सारांश'नंतर सुरू झालेला अनुपम खेर यांचा प्रवास पुढे न थांबणारा ठरला. एका मागे एक चित्रपटांतून त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांमधून त्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत होती. 1989 मध्ये आलेल्या 'राम लखन' चित्रपटासाठी अनुपम खेर यांना फिल्मफेयर पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर पाच वेळा 'फिल्मफेयर अवॉर्ड फॉर बेस्ट कॉमेडियन'चा किताबही अनुपम यांनी पटकावला. 'लम्हें' (1991), 'खेल' (1992), 'डर' (1993), 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे' (1995), 'विजय' (1988) यांसारख्या चित्रपटांतून साकारलेल्या भूमिकांमुळे अनुपम यांनी इंडस्ट्रीमध्ये आपली विशेष जागा निर्माण केली. अनुपम यांनी चित्रपटसृष्टीतील अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. याशिवाय त्यांना 2014 साली पद्मश्री पुरस्कार तर 2016 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

बॉलिवूडचे 'अनुपम अंकल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याने बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या कामाची छाप सोडली आहे. 'बेंड इट लाइक बेखम' (2002), 'लस्ट कॉशन' (2007), 'द बिग सिक' (2017), 'हॉटेल मुंबई' (2018) यांसारख्या हीट चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. 'सी.बी.एफ.सी', 'एन.एस.डी' आणि 'एफ.टी.आय.आय' यांसारख्या सरकारी संस्थांमध्ये अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. 

अनुपम खेर यांनी अभिनेत्री किरण खेरशी विवाह केला. अनुपमसोबत किरण यांनी दुसरा विवाह केला. दोघांची चंडीगढमध्ये भेट झाली. यादरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यानंतर त्याच वर्षी 1985 मध्ये अनुपम खेर आणि किरण लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाला 33 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही अनुपम खेर आणि किरण यांना बॉलिवूडची एव्हरग्रीन जोडी आहे.