Bhabi Ji Ghar Par Hain मधील 'तिवारीजीं'वर का आली ही वेळ?

ऐसी बेइज्जती तो पहले कभी नही हुई थी....   

Updated: Aug 9, 2021, 07:46 PM IST
Bhabi Ji Ghar Par Hain मधील 'तिवारीजीं'वर का आली ही वेळ?
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : भाबी जी घर पर हैं (Bhabi Ji Ghar Par Hain) या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावरह अधिराज्य गाजवलं आहे. उत्तर भारतीय भाषेचा लिहाज आणि सौंदर्य या मालिकेच्या निमित्तानं प्रेक्षकांना पाहता आलं. मालिकेतील प्रत्येक कलाकाराची विनोदी भूमिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास यशस्वी ठरली. पण, मुख्य कलाकारांपैकी एक असणाऱ्या रोहिताश गौड यांच्यावर मात्र सध्या आलेली वेळ पाहता सर्वांनाच धक्का बसत आहे. (Rohitash Gaud Instagram Video) 

खुद्द रोहिताश यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते बनियानमध्ये दिसत असून, रडवेला चेहरा केल्याचे दिसत आहेत. सोबतच व्हिडीओमध्ये तेरी दुनिया से हो के मजबूर चला...मैं बहुत दूर, बहुत दूर, बहुत दूर चला..., असं गाणंही वाजत आहे. हे प्रकरण जरा गंभीर दिसतंय असं वाटत असतानाच काही क्षणांनी मग हा व्हिडीओ धम्माल विनोदी अंदाजात सादर केल्याचं कळत आहे. हे कळताच कुणालाही हसू आवरत नाहीये. 

तिवारी जी अर्थात रोहिताशनं हा व्हिडीओ मालिकेच्याच अनुषंगानं पोस्ट केला असून, त्याची ही हालत अम्मानं केली आहे. शेजारी राहणाऱ्या महिलेवर प्रेम करणाऱ्या आपल्या मुलाची ही अवस्था करत अम्मा त्याला तंबीच देत आहे. तेव्हा आता अम्माची दमदाटी तिवारीच्या स्वभावात काही फरक पाडेल का, हे मालिकेच्या येत्या भागांमध्येच पाहायला मिळेल. 

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला अनेकांनी लाईक केलं असून, त्यावर कमेंटही केल्या आहेत. मागील 6 वर्षांहून अधिक काळापासून रोहिताश या मालिकेत भूमिका साकारत आहे. कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक व्हिडीओ आणि फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. ज्यामाध्यमातून चाहत्यांशी एक वेगळं नातं तयार झालं आहे.