'तारक मेहता'ला मिळाली 'ही' धमकी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

'तारक मेहता का उल्टा चष्मा', हा शो गेल्या 14 वर्षांपासून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

Updated: Aug 9, 2021, 06:54 PM IST
'तारक मेहता'ला मिळाली 'ही' धमकी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा', हा शो गेल्या 14 वर्षांपासून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक पात्र स्वतःमध्ये खूप खास बनलं आहे. शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणारा शैलेश लोढा नेहमीच समस्या सोडवताना दिसतो. मात्र, आता तो यामुळेच अडचणीत आला आहे.

शोचा मजेदार प्रोमो व्हायरल 
वास्तविक, नुकताच या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, तारक मेहता सकाळी ऑफिसला जाण्यास खूप उशीर करतो. गोकुळधाम सोसायटीचे इतर सगळे लोक खूप आनंदी आणि मजेदार दिसत आहेत. तसं, या समाजातील लोक नेहमी आनंदी असतात.

तारक मेहता ऑफिसला उशिरा आला 
अनेकदा शोमध्ये असं दिसून येतं की, जेव्हा जेव्हा गोकुळधामचे रहिवासी बोलायला बसतात तेव्हा त्यांना वेळेची कल्पना नसते. अलीकडच्या भागांमध्येही असंच काहीसं घडलं. प्रत्येकजण रात्री उशिरापर्यंत बसून बोलत बसतो आणि म्हणूनच तारक मेहता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठू शकत नाही. अशा स्थितीत त्याला ऑफिसमध्ये जाण्यास उशिर होतो

बॉसकडून धमकी
यानंतर तारक ऑफिसला जाण्यासाठी कॅब मागवतो, पण त्याला खूपच उशीर होतो. दरम्यान, त्याच्या बॉसचा फोन त्याला योतो, त्याचा बॉस त्याच्यावर खूप रागावतो. खरं तर, तारकला ऑफिसमध्ये जाऊन फाईल द्यायची असते आणि ऑफिसला पोहचण्यास विलंब झाल्यामुळे तो आवश्यक फाईल बॉसपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीत तारक मेहताला नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी मिळते.

तारकाला मदत मिळेल का?
मात्र, आता समाजातील तारकचे मित्र त्याची नोकरी वाचविण्यात मदत करतील का? हे पाहणं खूपच मनोरंजक ठरेल. हे जाणून घेण्यासाठी आता प्रेक्षकदेखील खूप उत्सुक आहेत