मादक सौंदर्यवतीच्या अदांनी नेटकरी पुन्हा घायाळ

तिने असेच काही फोटो शेअर केले आहेत जे पाहून.... 

Updated: Nov 9, 2019, 11:09 AM IST
मादक सौंदर्यवतीच्या अदांनी नेटकरी पुन्हा घायाळ
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई :  मालिका विश्वात नावारुपास आलेली अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड अदांमुळेही आकर्षणाचा विषय ठरते. आशिया खंडातील सर्वात मादक अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. आगामी मालिका, दैनंदिन जीवनतील काही प्रसंग, एखादा नवा लूक अशा अनेक पोस्ट निया सोशल मीडियावर शेअर करत असते. आतासुद्धा तिने असेच काही फोटो शेअर केले आहेत जे पाहून, नियाच्या मादक अदांनी नेटकरी आणि चाहते पुन्हा घायाळ झाले आहेत. 

लाल रंगाच्या टू पीस बिकीनीला पांढऱ्या, जाळीदार जॅकेटची जोड असणारा नियाचा हा बोल्ड लूक अनेकांचं लक्ष वेधत आहे. तिने हा फोटो पोस्ट करताच तो काही क्षणांमध्येच आकर्षणाचा विषय ठरला. कोणी तो लाईक करत, तर कोणी त्यावर कमेंट बॉक्समध्ये नियाच्या लूकसाठी प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याला दाद दिली. 

 

 
 
 
 

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये नियाच्या या अदा खऱ्या अर्थाने तिला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणत आहेत. मुख्य म्हणजे नियाच्या फोटोवर प्रशंसात्मक प्रतिक्रियांसोबतच काही नकारात्मक प्रतिक्रियाही आहेत. जेथे चाहत्यांमध्ये नियाच्या फोटोंच्या मुद्द्यावरुन शाब्दिक बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर चर्चा कोणत्याही सुरु असो, निया मात्र येत्या दिवसांमध्येही अशाच एखाद्या हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं म्हणायला हरकत नाही.