close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

घटस्फोटानंतर रश्मी देसाईच्या आयुष्यात 'त्याच्या' रुपात परतलं प्रेम

मालिका विश्वात आहे त्याच्या नावाची चर्चा 

Updated: Aug 18, 2019, 02:29 PM IST
घटस्फोटानंतर रश्मी देसाईच्या आयुष्यात 'त्याच्या' रुपात परतलं प्रेम
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : मालिका विश्वात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री रश्मी देसाई. 'उतरन' या मालिकेमुळे रश्मी खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेसोबतच तिच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बऱ्याच चर्चांनी जोर धरला. मालिकेतील सहकलाकारासोबतच रश्मीने लग्नगाठ बांधली. पण, त्यांचं हे नातं फार काळ टीकू शकलं नाही. 

पहिल्या लग्नातून घटस्फोट घेतल्यानंतर आणि काही कारणांस्तव रश्मी काही काळ छोट्या पडद्यापासून दूर राहिली. कालांतराने तिने पुन्हा एकदा मालिका विश्वात पदार्पण करत आपलं स्थान अबाधित असल्याचं दाखवून दिलं. अशा या अभिनेत्रीच्या जीवनात पुन्हा प्रेमाचा बहर आला आहे. माध्यमं आणि सूत्रांच्या माहितीनुसार रश्मी सध्याच्या घडीला 'बढो बहू' फेम अभिनेता अरहान खान याला डेट करत आहे. 

'बॉम्बे टाईम्स'च्या वृत्तानुसार २०१७ मध्ये पहिल्यांदाच युविका चौधरी आणि प्रिंस नरुला यांच्या विवाहसोहळ्यात रश्मी आणि अरहानची ओळख झाली होती. ज्यानंतर त्यांच्या नात्याला प्रेमाचं वळण मिळालं. दिवसागणिक हे नातं आणि त्याचे बंध आणखी दृढ झाले. आता कतर, रश्मी आणि अरहान या नात्याचा अधिक गांभीर्याने विचार करत असून, येत्या काळात ते लग्नगाठही बांधण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं जात आहे. 

चार वर्षांतच तुटलेले पहिल्य लग्नाचे बंध 

रश्मीने 'उतरन' या मालिकेच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ज्यानंतर, ती टेलिव्हीजन विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा ठरली. याच मालिकेच्या सेटवर तिची आणि नंदिशची ओळख झाली होती. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर रश्मी आणि नंदीशने २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांचं हे नाचं फार काळ टीकू शकलं नाही. अवघ्या चार वर्षांतच नंदिश आणि रश्मीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.