जॉनी सिन्सला 'सेक्स'चे सल्ले देतोय रणवीर सिंह! व्हिडीओ पाहून दीपिकालाही बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो जॉनी सिन्ससोबत दिसत आहे.

Updated: Feb 12, 2024, 05:18 PM IST
जॉनी सिन्सला 'सेक्स'चे सल्ले देतोय रणवीर सिंह! व्हिडीओ पाहून दीपिकालाही बसेल धक्का title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याची अतरंगी फॅशन नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र आता अभिनेत्याचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. तो अनेकदा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपट डॉन-३ साठी चर्चेत आहे.याशिवाय रणवीर एक असा अभिनेता आहे ज्याने नेहमीच आपल्या बोल्ड मूव्ह्सने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडला असून, अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

नुकताच त्याने एक बोल्ड केअर ब्रँण्डचं एडशूट केलं आहे. जे सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता फेमस अमेरिकन पोर्नस्टारसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर अभिनेत्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.  

काय आहे संपूर्ण प्रकरण
खरंतर रणवीर सिंहने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता प्रसिद्ध पॉर्न स्टार जॉनी सिन्ससोबत दिसत आहे. यामध्ये त्याच्याशिवाय अजून बरेच लोकंही दिसत आहेत. अशातच लोकांना हा व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसत आहे. इतकंच नाही तर हा व्हिडीओ पाहून लोकं हैराण होत आहे की, अभिनेता पॉर्न स्टारसोबत काय करत आहे.  

आम्ही तुम्हाला सांगतो की, एका प्रसिद्ध सेक्स केअरच्या प्रोडक्ट #TakeBoldCareOfHer ने खास मोहीम सुरु केली आहे. रणवीर सिंह या मोहिमेध्ये या ब्रँण्डचा फाउंडर म्हणून कार्यरत आहे. पुरुषांच्या लैंगिक आरोग्याविषयी मनमोकळेपणाने बोलणं हाच यामागचा उद्देश आहे. ही मोहिम खास पुरुषांसाठी करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये रणवीरसोबतच पॉर्न स्टार जॉनी सिन्सही सहभागी झाला आहे. ही जाहिरात सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणवीरच्या जाहिरातीवर कमेंट्सचा पाऊस
रणवीर सिंहच्या या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने कमेंट करत लिहीलं आहे की, 'आता काम न मिळत असल्याने अभिनेत्यावर अशी परिस्थिती आली आहे.' तर अजून एकाने लिहीलं आहे, आता दीपिकाचं काय होईल. तर अजून एकाने लिहीलंय, 'स्क्रिप्ट रायटरला 21 तोफांची सलामी.'