'मी आई होऊ शकत नाही हे मान्य करणं खूप कठीण...'; शबाना आझमी यांचा खुलासा

Shabana Azmi : शबाना आझमी यांनी नुकतच्या दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 18, 2024, 04:08 PM IST
'मी आई होऊ शकत नाही हे मान्य करणं खूप कठीण...'; शबाना आझमी यांचा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Shabana Azmi : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री शबाना आजमी यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. शबाना यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आई न होण्याची खंत व्यक्त केली. इतकंच नाही तर त्यांनी हे देखील सांगितलं की जेव्हा त्या आई होऊ शकत नाही ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांना काय वाटलं याशिवाय त्यांनी स्वत: ला कसं सांभाळलं याविषयी सांगितलं. 

शबाना आजमीनं 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'या गोष्टीला मान्य करणं माझ्यासाठी खूप कठीण आहे की मी आई होऊ शकत नाही. जेव्हा एक महिला आई होऊ शकत नाही, तेव्हा हा समाज ती संपूर्ण नाही अशी जाणीव करून देतात. अशात तुम्हाला स्वत: ला त्यातून बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. महिला नेहमीच त्यांना काय किंमतीचा अंदाज त्यांच्या नात्यांमध्ये लावू लागतात. पण एक पुरुष असं करत नाही. पुरुषाला त्याचं करिअर आणि त्याचं काम संतुष्टी देतं. मला वाटतं की महिलांना देखील त्यांचा आनंद त्यांच्या कामात शोधायला हवा.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शबाना आजमी यांनी पुढे सांगितलं की 'मला माहित आहे की मी माझी आई (दिवंगत अभिनेत्री शौकत आजमी) ला विचारला होतं...  माझी आई खूप चांगली गृहिणी आणि पत्नी होती... मी तेव्हा त्यांना विचारलं की त्यांना सगळ्यात जास्त समाधान कशातून मिळतं तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं त्यानं मी हैरान झाले. त्यांनी सांगितलं की महिलांना त्यांच्या नात्यांच्या बंधनातून पुढे जाऊन, स्वत: साठी, काम करायला हवं. मी असं करत नाही की त्यांनी त्यांच्या कर्तव्यापासून दूर जावे, अजिबात नाही, तर त्यांनी त्यांच्या कर्तव्याबरोबरच स्वत:साठीही काहीतरी केले पाहिजे, जेणेकरून त्यांना आनंद वाटेल आणि त्यांचा जोडीदार त्यांचा आदर करेल.'

हेही वाचा : 'आईसोबतच्या माझ्या खास आठवणी या...', जान्हवी कपूरस्पष्ट तमिळ बोलताच ज्युनियर एनटीआरनं थक्क, पाहा Reaction

शबाना आजमी यांच्या वाढदिवसाविषयी बोलायचे झाले तर त्या यावेळी त्यांचा वाढदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा करत आहे. त्यानं अनेक हिट चित्रपट दिले आणि त्यांच्या अभिनयासाठी त्या ओळखू लागल्या. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x