'माझा शेवटचा चित्रपट...', चित्रपटसृष्टीतून शाहरुख खान घेणार रिटायरमेन्ट!

Shah Rukh Khan : शाहरुख खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या रिटायरमेन्टवर खुलासा केला आहे.

दिक्षा पाटील | Updated: Feb 16, 2024, 04:15 PM IST
'माझा शेवटचा चित्रपट...', चित्रपटसृष्टीतून शाहरुख खान घेणार रिटायरमेन्ट!  title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. त्यातील जास्त चित्रपट हे हिट ठरले आहेत. गेल्या वर्षभरापासून त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे. त्या आधी शाहरुखचे चित्रपट आधीसारखे हिट होत नव्हते. खरंतर, मोठ्या ब्रेकनंतर शाहरुखनं चित्रपटांमध्ये कमबॅक केलं आहे. खरंतर, मोठ्या ब्रेकनंतर शाहरुखनं जी एन्ट्री केली आहे त्यानंतर लागोपाठ त्याचे तिनही चित्रपट हे सुपरहिट ठरले आहेत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहरुखनं त्याच्या रिटायरमेंटविषयी वक्तव्य केलं आहे. 

शाहरुखनं या मुलाखतीत म्हणाला की 'पहिली गोष्ट पुढची 30-35 वर्ष मी चित्रपटात काम करणं सोडणार नाही. आता माझा रिटायर होण्याचा काहीही प्लॅन नाही. माझी इच्छा आहे की माझा शेवटचा चित्रपट सगळ्यांना आवडायला हवा, संपूर्ण जगाला पसंत यायला हवा. या दरम्यान, शाहरुखनं प्रेक्षकांना उर्दू आणि अरेबिक शिकण्यास देखील सांगितले. जेणेकरून ते त्याचा शेवटचा चित्रपट समजू शकतील.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहरुखनं केलेल्या या वक्तव्यानं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की त्याचा शेवटचा चित्रपट हा संपूर्ण जगात पाहायला हवा आणि सगळ्यांना कळायला हवा अशी त्याची इच्छा आहे. या कार्यक्रमात किंग खाननं सांगितलं की ज्या दिवशी त्याचा चित्रपट प्रदर्शित होते, त्याच्या अगोदर तो जवळपास 2 ते अडीच तास अंघोळ करतो. शाहरुख म्हणाला, भारतात चित्रपट हे शुक्रवारी किंवा गुरुवारी रात्री प्रदर्शित होतात. तर त्याच्या अगोदर म्हणजेच जवळपास 2 ते अडीच तास मी माझ्या घरी अंघोळ करत असतो. त्यानंतर मी माझं संपूर्ण काम हे काढून टाकतो. त्यामुळे त्याला खूप मस्त वाटतं. 

हेही वाचा : ... तर ऐश्वर्या नव्हे, ईशा देओल असती बच्चन कुटुंबाची सून!

शाहरुख आता लवकरच किंग या चित्रपटात दिसणार आहे. असं म्हटलं जातं की हा अॅक्शन पॅक चित्रपट असणार आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे या चित्रपटात शाहरुखसोबत त्याची लेक सुहाना देखील असणार आहे. दरम्यान, स्वत: त्या दोघांनी कोणतीही माहिती दिली नाही. आता दोघं फक्त घोषणेची प्रतिक्षा करत आहेत. शाहरुखच्या आधीच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर गेल्या वर्षी म्हणजेच 2023 च्या सुरुवातीला त्याचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 'जवान' आणि मग 'डंकी'. हे तिन्ही चित्रपट सोशल मीडियावर हिट ठरले.