बॉलिवूडचा बादशाह करतो आपल्या मुलांमध्येच भेदभाव? या आरोपावर शाहरुख म्हणतोय...

सुहाना आणि आर्यनपेक्षा शाहरुख करतो अब्राहिमवर प्रेम

Updated: Jun 21, 2021, 03:26 PM IST
बॉलिवूडचा बादशाह करतो आपल्या मुलांमध्येच भेदभाव? या आरोपावर शाहरुख म्हणतोय...

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला आर्यन खान, सुहाना खान आणि अब्राहम खान अशी तीन मुलं आहेत. सुहाना तिच्या वडिलांवर खूप प्रेम करते आणि बर्‍याचदा त्याच्याबरोबर फोटोही शेअर करते. नुकताच तिने आपल्या बालपणीचे एक फोटो शेअर केला होता. या फोटोत शाहरुख खान बेबी सुहानाला किस करताना दिसत आहे.

त्याचवेळी शाहरुख खान आणि मोठा मुलगा आर्यन खान यांच्यातील बॉन्डिंगही आश्चर्यकारक आहे. आर्यन बर्‍याचदा वडिलांसोबत फोटोही शेअर करत असतो. मात्र सुहाना आणि आर्यन खान यांना असं वाटतं की, त्यांच्या वडिलांना त्यांचा धाकटा भाऊ अब्राहम या दोघांपेक्षा जास्त आवडतो. याचा खुलासा स्वतः शाहरुख खानने एका मुलाखतीत केला होता.

शाहरुख खानने २०१५मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, 'सुहाना आणि आर्यन अनेकदा शाहरुखवर आमच्यापेक्षा जास्त अब्राहमवर प्रेम करतात असा आरोप करतात. शाहरुख खान म्हणाला होता, "जेव्हा माझी दोन मुलं 'पापा, तू त्याच्यावर जास्त प्रेम करतोस' असं म्हटतात तेव्हा मी त्यांना सांगतो, 'तुम्हाला कसं समजलं मी तुझ्यावर प्रेम करत नाही?' जेव्हा तूम्ही ईब्राहिम एवढे होतात त्या वयात माझं तुमच्यावरही असंच प्रेम होतं."

स्ट्रिक्ट वडिल नाहीये शाहरुख खान 
शाहरुख खान म्हणाला, "मी स्ट्रिक्ट वडिल नाही आहे. अब्राहम माझ्याकडे वारंवार येतो." अब्राहमच्या जन्मानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल घडले हे देखील त्याने या मुलाखतीमध्ये सांगितले होतं.

अब्राहम हा शाहरुखसारखाच आहे
शाहरुख खान म्हणाला, "अब्राहमला माझ्याबरोबर बाहेर यायला आवडतं, तर आर्यन आणि सुहाना गर्दी टाळतात. अब्राहममध्ये मला एक चांगला मित्र सापडला आहे. तो माझ्यासारखा जरा वेडा आहे. तो माझ्यासोबत खूप खेळतो. तो आपला चेहरा झाकून म्हणतो: 'पापा, अब्राहम कुठे आहे?'. मी माझ्या मुलांबरोबर अगदी फ्रेंन्डली झालो आहे."