Yoga Day 2021: प्रवीण तरडेंनी दाखवला कसा करावा सूर्य नमस्कार; पाहा VIDEO

योग दिन कोरोनाचे  नियम पाळत साजरा करण्यात येत आहे.

Updated: Jun 21, 2021, 02:35 PM IST
Yoga Day 2021: प्रवीण तरडेंनी दाखवला कसा करावा सूर्य नमस्कार; पाहा  VIDEO

मुंबई : आज सर्वत्र योग दिन कोरोनाचे  नियम पाळत साजरा करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊटंच्या माध्यमातून योग दिनाच्या शुभेच्छा देत चाहत्यांना फीट राहण्याचं आवाहन केलं आहे.  यामध्ये अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील फेसबूकच्या माध्यमातून चाहत्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांनी  सूर्य नमस्काराचं महत्त्व पटवून देत सूर्यनमस्कार करून देखील दाखवला आहे. 

त्यांनी सूर्य नमस्काराचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा... प्रत्येक भारतीयाने जगभरात ताठमानेनं मिरवावी अशी अमूल्य गोष्टं म्हणजे योग साधना .. सूर्य नमस्कार हा तर योगासनातील परिपूर्ण योग..' असं लिहीलं आहे. 

सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या कामाबद्दल सांगायचं अनेक चित्रपटांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. शिवाय आता त्यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'सरसेनापती हंबीरराव' लवकरचं चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. आता हा चित्रपट कधी रूपेरी पडद्यावर झळकतो याच प्रतीक्षेच चाहते आहेत.