सोशल मीडियावर या 'BAD BOY' ला फॉलो करतो आर्यन खान

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे सध्या खूप चर्चेत आहे. 

Updated: Oct 4, 2021, 08:13 PM IST
सोशल मीडियावर या 'BAD BOY' ला फॉलो करतो आर्यन खान title=

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे सध्या खूप चर्चेत आहे. आर्यन खानला एनसीबीने एका रेव्ह पार्टीतून अटक केली आहे. आर्यन खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्याही येत होत्या. पण रुपेरी पडद्यावर पाऊल टाकण्यापूर्वीच त्याचं नाव या ड्रग्स प्रकरणाशी जोडलं गेलं आहे.

सुपरस्टारसारखं आहे फॅनफॉलोईंग
किंग खानच्या मुलाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत चाहते रस घेत असतात. पण इन्स्टाग्रामवर आर्यनची एक्टिविटी कशी होती हे तुम्हाला माहिती आहे का? आर्यन खानची लोकप्रियता एका चित्रपटात काम न करता सुपरस्टारसारखी आहे. त्याचं इन्स्टाग्रामवर वॅरिफाइड अकाउंट आहे. ज्यावर सुमारे 15 लाख लोक त्याला फॉलो करतात. पण आर्यन खान कोणाला फॉलो करतो?

438 लोकांना फॉलो करतो आर्यन
आर्यन इंस्टाग्रामवर एकूण 438 लोकांना फॉलो करतो. यामध्ये काही अतिशय लोकप्रिय सेलिब्रिटी तसंच BAD BOY चा समावेश आहे. आम्ही खूप प्रसिद्ध रॅपर बादशाह बद्दल बोलत आहोत. ज्याच्या इन्स्टाग्राम खात्याचं नाव BAD BOYSHAH आहे. अभिनेत्रींबद्दल बोलताना, त्याची बहीण सुहाना खान व्यतिरिक्त, आर्यन आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि भावना पांडे सारख्या अभिनेत्रींना फॉलो करतो.

आईचेही अनेक मित्र आहेत सामिल
आर्यन खान देखील त्याची आई गौरी खानच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे. यामध्ये महिप कपूर, सीमा खान आणि मालविका मोहनन सारख्या सेलेब्सचा समावेश आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलताना, शाहरुख खानचा मुलगा आर्यन काही काळ त्याच्या वडिलांना अॅक्शन सीन्सच्या टिप्स देत होता. शाहरुख खान लवकरच पठाण चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे.