Aryan Khan Drugs Case : गौरी खानचा अन्नत्याग; आर्यन परतण्याकडेच तिचे डोळे....

बातमी चिंता वाढवणारी.... 

Updated: Oct 28, 2021, 04:40 PM IST
Aryan Khan Drugs Case : गौरी खानचा अन्नत्याग; आर्यन परतण्याकडेच तिचे डोळे....
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : (Aryan Khan Drugs Case) आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात आता नव्यानं समोर येणारी प्रत्येक माहिती शाहरुख खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या अडचणींमध्ये भर टाकत आहे. मुलगा 23 दिवसांहून अधिक काळापासून कारागृहात असल्याचं पाहत आता त्याची आई, गौरी खान प्रचंड शारीरिक आणि मानसिक तणावाखाली आहे. 

आर्यनची सुटका होईल अशी शक्यता काहींनी व्यक्त केली आहे. पण, अद्यापही चित्र स्पष्ट नाही. न्यायालयाचा अधिकृत निर्णय समोर येत नाही, तोवर आर्यन खानच्या भविष्यावर सावटच दिसत आहे. 

मुलाला इतक्या अडचणीत पाहून गौरी खान दर दिवशी तिळतिळ तुटत चालली आहे. तिला जास्तीत जास्त वेळ रडण्यात आणि देवापुढे हात जोडण्यातच जात आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार मुलाच्या काळजीपोटी गौरी तिच्या आरोग्याची हेळसांड करु लागली आहे. तिनं जवळपास पूर्णपणे अन्नत्याग केल्याचं म्हटलं जात आहे. 

आर्यनबाबत ती कोणाशीही काहीच बोलताना दिसत नाही. या साऱ्याचा तिच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होत आहे. ज्यामुळं आता अनेकांनीच गौरीबाबत चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. 

आर्यनच्या जामीन अर्जाचा मिळणारी नामंजुरी पाहून ती आणखी खचली आहे. शाहरुख तिच्या तुलनेनं किमान परिस्थितीत स्वत:ला सावरून आहे. 

मुख्य म्हणजे सध्या खान कुटुंबावर आलेलं संकट पाहता मित्रपरिवार त्यांना आधार देत आहे. पण, गौरीनं मात्र कोणाच्याही संपर्कात येणं बंद केलं आहे. तिचा संयम आता अंत पाहू लागला आहे. एक आई म्हणून गौरी खानची ही अवस्था शाहरुखसह इतरांच्या जीवाला हुरहूर लावत आहे.