Video: 'त्याच्या' गालाला गाल लावल्यानंतर शाहरुखने स्टेजवरच अभिनेत्रीच्या साडीचा पदर पकडून...

Shah Rukh Saree Video: पुरस्कार सोहळ्यामधील या प्रसंगाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्यांची चाहत्यांमध्ये चर्चा असल्याचं दिसून येत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 1, 2024, 12:54 PM IST
Video: 'त्याच्या' गालाला गाल लावल्यानंतर शाहरुखने स्टेजवरच अभिनेत्रीच्या साडीचा पदर पकडून...
हा व्हिडीओ आणि फोटो चर्चेचा विषय ठरतोय (फोटो सौजन्य 'आयफा'च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

Shah Rukh Saree Video:: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या चर्चेत आहे तो इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी म्हणजेच 'आयफा'च्या पुरस्कार सोहळ्यामध्ये या पुरस्कार सोहळ्यात शाहरुखची अँकरींग, डान्स, पुरस्कार जिंकल्यानंतरचं भाषण या साऱ्या गोष्टी चर्चेत राहिल्याच. मात्र सोहळ्यादरम्यान त्याने केलेल्या अन्य एका कृत्याचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

Add Zee News as a Preferred Source

नेमकं घडलं काय?

झालं असं की, या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या 'मीसेस चॅटर्जी व्हेर्सेस नॉर्वे' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकली. राणीला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ती स्टेजवर आली. तिने कार्यक्रमाचा होस्ट असलेला दिग्दर्शक करण जोहरच्या गालाला गाल लावून त्याला ग्रीट करत मिठी मारली. हे सारं सुरु असताना शाहरुख करणच्या बाजूलाच उभा होता. राणी पुरस्कार जिंकल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी स्टेजच्या दुसऱ्या बाजूला ठेवलेल्या माईककडे जात असताना शाहरुखला तिच्या साडीचा पदर लोळत असल्याचं दिसलं. शाहरुखने लगेच तिचा पदर हातात घेतला आणि तिच्या मागे चालू लागला. शाहरुखला हे करताना पाहून राणीही गालात खुदकन हसली. तिने या मदतीसाठी शहारुखचे आभार मानले. 'आयफा'च्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन हा व्हिडीओ आणि फोटोही शेअर करण्यात आले आहेत.

शेअर केला व्हिडीओ

'आयफा'ने हा व्हिडीओ शेअर करताना, पुन्हा आम्ही आठवणींमध्ये रमून गेलो. राणी, शाहरुख आणि करणचं असं एकत्र येणं खरोखरच खास आहे, अशा अर्थाची कॅप्शन दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IIFA Awards (@iifa)

फोटोंना दिलेली कॅप्शन चर्चेत

नंतर शाहरुख राणीचा पदर पकडून तिच्या मागून चालत असल्याचे फोटो शेअर करत 'आयफा'ने, "पुन्हा एकदा चलते चलते... (हा या दोघांचा चित्रपट आहे) शाहरुख आणि राणीची सुंदर जोडी आपल्याला पाहायला मिळाली," अशा अर्थाची कॅप्शन दिली आहे. तुम्हीच पाहा ही पोस्ट...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IIFA Awards (@iifa)

एकत्र काम करा अशी अनेकांची मागणी

शाहरुखची ही कृती त्याच्या चाहत्यांना भावली असून उगाच नाही त्याला जंटलमन म्हणत असं त्याच्या चाहत्यांनी म्हटलंय. अनेक चाहत्यांनी शाहरुख-काजोल आणि शाहरुख-राणी ही हिंदी चित्रपटसृष्टीमधील सदाबहार जोड्यांपैकी एक आहे असं म्हटलं आहे. काही चाहत्यांनी तर या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र काम केलं पाहिजे असं म्हटलं आहे. शाहरुख आणि राणी या दोघांचा अभिनय उत्तम असून आजही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची केमिस्ट्रीही उत्तम असून त्यांनी खरोखरच एकत्र काम करण्याचा विचार केला पाहिजे असं अनेकांनी या फोटो आणि व्हिडीओखालील कमेंट बॉक्समध्ये म्हटलं आहे. दरम्यान, राणीबरोबरच शाहरुखलाही 'जवान' चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More