कोरोना नव्हे, शाहिदला भलत्याच गोष्टीची भीती...

...म्हणून शाहिदने मास्क घातला आहे.     

Updated: Mar 15, 2020, 03:20 PM IST
कोरोना नव्हे, शाहिदला भलत्याच गोष्टीची भीती...

मुंबई : कोरोना व्हायसरमुळे जर्सी सिनेमाचं शुटींग देखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अभिनेता शाहद कपूरही मुंबईत परतला आहे. मास्क लावत मुंबईच्या विमानतळावर शाहिद दाखल झाला. यावेळी त्याने सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. अशा चर्चा सध्या जोर धरत आहे. तर शाहिदला कोरोनामुळे नाही तर दुसऱ्याच कारणामुळे मास्क घालावा लागला आहे. तो सध्या त्याच्या आगामी 'जर्सी' चित्रपटाच्या शूटींग मध्ये व्यस्त आहे. 

चित्रपटाच्या शूटींग दरम्यान त्याच्या ओठांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने मास्क घातला आहे. चंदिगडमध्ये शूटिंग सुरू असताना त्याला दुखापत झाली. मार लागल्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. शिवाय या धोकादायक व्हायरसमुळे अनेक कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. 
कोरोना व्हायरसचा फटका फिल्म इंडस्ट्रीला बसला आहे. त्यामुळे अनेक सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

कोरोनाचा वाढता फैलाव वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. खबरदारी म्हणून राज्यातील सर्व जीम, स्विमिंग पूल, थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.