शाहीदच्या पत्नीने केलं असं काम; लोक म्हणाले 'आमच्या पण पत्नीला शिकव...'

शाहीदच्या पत्नीने असं काय केली की युझर्स म्हणाले  'आमच्या पण पत्नीला शिकव...'

Updated: Aug 25, 2021, 08:45 AM IST
शाहीदच्या पत्नीने केलं असं काम; लोक म्हणाले 'आमच्या पण पत्नीला शिकव...' title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मिरा राजपूत अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. मिरा सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. मिरा तिचे आणि पती शाहीद कपूरचे फोटो शेअर करत असते. शिवाय  मिरा तिच्या खासगी आयुष्याबद्दल ही उघडपणे बोलत असते. सध्या मिराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मिरा असं काही सांगत आहे ज्यामुळे युझर्स म्हणत आहेत की आमच्याही पत्नीला शिकवा... 

या व्हिडिओमध्ये ती अवघ्या एका मिनिटांत असं काम करत आहे, जे करायला महिला अनेक तास लावतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. शिवाय कमी वेळात उत्तम मेकअप कसा करू शकतो हे देखील मिरा सांगत आहे. अनेकांना मिराचा हा हटके अंदाज आवडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओमध्ये मिरा सांगते, 'मेकअप करण्यासाठी फक्त 1 मिनिट  पुरेसा आहे. महत्त्वाचं म्हणजे अधिक काळ मला विना मेकअप रहायला आवडतं. पण जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा अगदी हलका मेकअप करते. मी कधीच फाउंडेशन लावत नाही. मी फक्त माझ्या डोळ्यासोबत खेळते आणि मी कायम ओठांना न्यूड आणि नॅचरल ठेवते...' मिराचा हा व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

मिराच्या या व्हिडिओवर कमेन्टचा पाऊस पडत आहे. एका युझरने कमेन्टमध्ये लिहिलं 'शाहीदला माझा सलाम...' तर दुसऱ्या युझरने कमेन्ट केली की 'मझ्या पत्नीला देखील शिकवा...' एवढंच नाही तर काहींनी आयलायनर कसं लावतात? हा प्रश्न देखील विचारला आहे. सध्या मिराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.