'तो नेहमी बेडवर...' अभिनेत्याच्या पत्नीकडून बेडरुममधील खाजगी गोष्ट समोर

अनेकदा त्याचे ब्लँकेट काढून घेते...

Updated: Jan 7, 2022, 05:06 PM IST
  'तो नेहमी बेडवर...' अभिनेत्याच्या पत्नीकडून बेडरुममधील खाजगी गोष्ट समोर  title=

मुंबई : शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत भलेही मोठ्या पडद्यावर दिसली नसेल, पण तिची लोकप्रियता बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. मीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मीडियाचे कॅमेरेही तिला सर्वत्र फॉलो करतात. मीरा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.

कधी ती पती शाहिद कपूरसोबत रोमँटिक व्हिडिओ शेअर करताना दिसते, तर कधी फनी व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. वयाच्या 21 व्या वर्षी मीराने शाहिद कपूरसोबत लग्न केले. तेव्हापासून मीरा रोजच चर्चेत असते. अगदी मीराने एका शोदरम्यान तिचे बेडरुम रिक्रेट देखील शेअर केले आहे.

वास्तविक, 2015 साली शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत नेहा धुपियाने होस्ट केलेल्या टॉक शोमध्ये पोहोचले होते. या मुलाखतीदरम्यान एक टास्क आला.ज्याचं नाव 'स्केरी स्पाइस' असं होतं.

या सेगमेंटमध्ये मीराला विचारण्यात आले की, बेडवर तुझी आवडती पोझिशन कोणती आहे? हा प्रश्‍न ऐकून शाहिद कपूर थोडा लाजलेला, मात्र, मीरा अजिबात लाजली नाही.

मीराकडे प्रश्नाचे उत्तर न देण्याचा पर्याय होता, पण तिने लगेच प्रश्न घेतला आणि उत्तर दिले. मीराने सांगितले की, शाहिद नेहमी बेडवर काय करायचे ते सांगतो. ती म्हणाली, 'मला वाटते की तो कंट्रोल फ्रीक आहे. काय करायचे ते तो नेहमी सांगतो.

या मुलाखतीत मीराने असेही सांगितले की जेव्हा शाहिद त्याच्या कुटुंबासोबत बसतो तेव्हा ती त्याला किस करायला मागेपुढे पाहत नाही.

यापूर्वी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये शाहिदने सांगितले होते की मीरा अनेकदा त्याचे ब्लँकेट काढून घेते आणि थंडीत त्याला कपड्यांशिवाय सोडले जाते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या शोमध्ये शाहिदने सांगितले की तो मीराला घाबरतो. तो टॉयलेट सीट परत खाली करायला विसरला तर मीरा त्याला खूप लेक्चर देते. मीरा आणि शाहिदने एकूणच त्यांच्या नात्यातील अनेक सिक्रेट आतापर्यंत रिवील केले आहेत.