शाहिदच्या मुलाचा पहिला फोटो व्हायरल

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा कपूरच्या मुलाचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Feb 28, 2019, 09:17 AM IST
शाहिदच्या मुलाचा पहिला फोटो व्हायरल

मुंबई : बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल पैकी एक असणाऱ्या अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा कपूरच्या मुलाचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मीराने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. मीराने गतवर्षी 5 डिसेंबर रोजी झैनला जन्म दिला होता. सहा महिन्यांनंतर मीराने सोशल मीडियावर मुलाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मीराने हा फोटो शेअर करत 'लिमिटेड एडिशन बेबी'. अले कॅप्शन दिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Limited edition, baby.

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

 

बॉलिवूड किड्समध्ये अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खानचा मुलगा तैमूर फारच लोकप्रिय आहे आणि आता तैमूरला टक्कर देण्यासाठी झैन सज्ज झाला आहे. 

7 जुलै 2015 मध्ये शाहिद-मीरा विवाह बंधणात बांधले गेले. त्यानंतर 26 ऑगस्ट 2016 मध्ये मीराने मिशाला जन्म दिला. दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' च्या चॉट शो मध्ये पहिल्यांदाच टिव्हीवर डेब्यू केला होता.